शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मध्यवर्ती रुग्णालयात मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचे ‘कामबंद’; अधीक्षकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:41 IST

सोमवारी रुग्णालयाच्या प्रांगणात मोटारसायकल उभी केली होती. दुपारी १.३० च्या दरम्यान कोरोना रुग्णालयाचा अहवाल शासनाला पाठविण्यासाठी स्टॅम्प हवा असल्याने ते बाहेर जाण्यास निघाले

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाचे सामाजिक अधीक्षक सतीश वाघ यांना सोमवारी करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी काहीकाळ कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

वाघ यांनी सोमवारी रुग्णालयाच्या प्रांगणात मोटारसायकल उभी केली होती. दुपारी १.३० च्या दरम्यान कोरोना रुग्णालयाचा अहवाल शासनाला पाठविण्यासाठी स्टॅम्प हवा असल्याने ते बाहेर जाण्यास निघाले. तेव्हा साध्या वेषातील पोलिसांनी त्यांना मोटारसायकल काढण्यास मनाई केली. त्या वेळी त्यांनी स्टॅम्प आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी आपले काहीच न ऐकता मारहाण करीत फरफटत मध्यवर्ती रुग्णालयात नेल्याचे वाघ यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा निषेध केला. तसेच डॉ. शिंदे यांनी पोलीस उपायुक्तांकडे कारवाईची विनंती केली.

वाघ यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी पोलीस उपायुक्त व मध्यवर्ती पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकाराने मध्यवर्ती रुग्णालय विरुद्ध पोलीस असे चित्र शहरात निर्माण झाले आहे.किरकोळ भांडण-सुरडकरवाघ व पोलीस यांच्यात किरकोळ भांडण झाले, अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर यांनी देऊन अधिक चौकशी करण्याचे संकेत त्यांने दिले. वाघ यांच्या मारहाणीप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.