शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी, १० एप्रिलपर्यंत अँन्टिजेन टेस्ट करण्यासाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 13:34 IST

coronavirus in Thane : विविध आस्थापनांमध्ये काम करणा:यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळ पासूनच महापालिकेच्या विविध केंद्रावर नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते.

ठाणे  - विविध आस्थापनांमध्ये काम करणा:यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळ पासूनच महापालिकेच्या विविध केंद्रावर नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे यांनी कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली तरच त्यांना काम करायला दिले जाईल असे आदेश आहेत. त्यामुळेच ही गर्दी ओसंडल्याचे दिसत होते. परंतु महापालिकेची काही केंद्र सकाळी ११ नंतर सुरु झाल्याने नागरीकांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत होते.राज्य सरकारच्या वतीने मिनी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यानुसार आता त्यिावश्यक सेवेत काम करणारे, दुकानात काम करणारे, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे, रिपेरिंगचे काम करणारे आदींसह विविध आस्थापनेत काम करणा:यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. येत्या 1क् एप्रिलच्या आत ही चाचणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच गुरुवारी सकाळ पासून शहरातील अनेक केंद्रावर चाचणी करुन घेण्यासाठी एकच गर्दी उसळल्याचे दिसून आले. त्यातही रिक्षा चालक , टॅक्सी चालक यांना देखील १० एप्रिल र्पयत चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने त्यांनी देखील चाचणी करुन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करीत असल्याचे दिसत होते.

ठाणे  महापालिका हद्दीत अॅन्टीजेन चाचणीचे १२ केंद्र असून ते शहराच्या विविध भागात सुरु आहेत. त्यानुसार मानपाडा, टेंभी नाका, कळवा, वागळे, सावरकरनगर, लोकमान्य नगर आदींसह इतर केंद्रांच्या बाहेर देखील सकाळ पासूनच नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु अनेक केंद्र ११ नंतर सुरु करण्यात येत असल्याने रांगते उभे असलेल्या नागरीकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यातही अतिशय धिम्या गतीने अनेक केंद्रावर कामे सुरु असल्याचे चित्र दिसत होते. तर अनेक केंद्रावर मनुष्यबळाचा अभावही जाणवत होता. त्यातही उशिराने केंद्र सुरु झाल्याने अनेक केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. व्यापा:यांची दुकाने सुरु होणार अशी आशा असल्याने येथील कर्मचा:यांनी चाचणी करुन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

ठाणो महापालिका हद्दीत १२ केंद्रावर अॅन्टीजेन चाचणी केली जात आहे. परंतु विविध आस्थापनांवरील कर्मचा:यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने केंद्रावर गर्दी झाली होती. - डॉ. राजू मुरुडकर (मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे