शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मुंब्य्रातून लखनऊला पळून जाण्याच्या प्रयत्नातील कोरोनाग्रस्त महिलेला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 05:15 IST

मुंब्य्रातील कौसा येथे एका रुग्णाचा २९ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता

ठाणे: कोरोनाग्रस्त महिलेने मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेण्याचा बहाणा करून मुंब्रा येथून थेट लखनऊ येथील आपल्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कौसा येथील ठाणे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने तीन मुलांसह मुंबई विमानतळावरून तिला नुकतेच ताब्यात घेतले आहे. या चौघांनाही आता मुंब्रा येथील विलगीकरण केंद्रात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील कौसा येथे एका रुग्णाचा २९ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, मुंबईच्या सेव्हन हिल्स रु ग्णालयात उपचार घेऊ, असे सांगून ही महिला मुलांसह ३० जून रोजी मुंबईत गेली. रुग्णालयात दाखल न होता तिने लखनऊ येथे आपल्या गावी जाण्यासाठी विमानतळ गाठले. ती विमानतळावर पोहोचल्याची माहिती तिच्या मोबाइलमधील आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे ठाणे आरोग्य विभागाला मिळाली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या मदतीने तिच्यासह तिच्या तिन्ही मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंब्रा येथील क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केले. मुंब्रा येथील रु ग्णालयात मुलांना आणि आपल्याला वेगवेगळे ठेवले जाईल, त्यामुळे मुलांपासून विलग होण्याच्या भीतीने आपण गावी नातेवाइकांकडे जाऊन उपचार घेणार होतो, अशी माहिती तिने ठामपाच्या आरोग्य विभागाला दिली.ही महिला कोरोनाग्रस्त असूनही ती उपचार घेण्याच्या नावाखाली मुंबईत गेली. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याऐवजी तिने विमानतळ गाठल्याचे समजल्यानंतर तातडीने हालचाली करून मुंबई पोलिसांच्या मदतीने तिला मुलांसह ताब्यात घेतले.- डॉ. हेमांगी घोडे, आरोग्य अधिकारी, कौसामुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ही महिला उपचारासाठी जाणार होती. तिकडे न गेल्यामुळे मुंबई पोलीस आणि ठाणे महापालिका प्रशासनाने तिला ताब्यात घेऊन आता विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. तिच्यावर बेतलेली परिस्थिती लक्षात घेता या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmumbraमुंब्राthaneठाणे