शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाच्या नियमांना कात्रजचा घाट; ठाणे शहरात कडक लॉकडाऊनचीच गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:31 IST

गेल्यावर्षी नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली होती. पण, आता किती दिवस घाबरून घरात बसायचे, असा विचार करून सामान्य माणूस घराबाहेर पडू लागला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक चणचण जाणवू लागल्याने घर कसे चालवायचे, अशी चिंता सामान्यांना वाटू लागली. यातूनच नागरिक बिनधास्त फिरत आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. यापार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमांचे पालन कितपत होते, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

अजित मांडके/नितीन पंडितठाणे  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आजही गर्दी दिसत आहे. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी घेण्याचा नियम असतानाही तीन ते पाच प्रवासी बसवले जात आहेत. परिवहनच्या बसमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातल्या त्यात हॉटेलचालक मात्र रात्री साडेअकरा वाजता शटर डाऊन करुन पालिकेला सहकार्य करत असल्याचे दिसत आहे. परंतु येऊर, घोडबंदर भागातील ढाबे रात्री एक ते दोनपर्यंत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. 

महापालिका हद्दीत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. या रुग्णांसाठी पालिकेने कोविड सेंटरमध्ये ४ हजार २२१ बेड आरक्षित केले आहेत. त्यानुसार मागील १९ दिवसांत शहरात ५ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत शहरात ३०० ते ५०० रुग्ण दिवसाला आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्यास सुरुवात केली आहे. ठाणेकरांना मात्र याची तमाच नसल्याचे पाहणीत दिसून आले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. रिक्षातून दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तीन प्रवासी घेऊन जातात, तर शेअर रिक्षांवर जास्तीचे प्रवासी नेल्यास कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवासी आजही वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नेले जात आहेत. दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून एका सीटवर एक प्रवासी असे स्पष्ट करण्यात आले असतानाही बस भरून जाताना दिसतात. इतरांचे सोडा, महानगरपालिकेची व्यवस्थाच नियमांचे पालन करत नसेल, तर त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. 

भिवंडी

काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या कोरोनाने मार्च महिन्यात डोके वर काढायला सुरुवात केली आहे. भिवंडीतही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात आटोक्यात असलेला कोरोना हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत रोज पाच ते सात असलेली रुग्णसंख्या मार्च महिन्यात दुपटीने वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात भिवंडी शहरातील रुग्णसंख्या १६६ वर पोहोचली, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही २०५ दिवसांवर आला आहे. 

इतर शहरांच्या तुलनेने भिवंडीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात आली असली तरी भिवंडीकरांकडून कोरोना नियमांचे फारसे पालन होताना दिसत नाही हे वास्तव आहे. विशेष म्हणजे पोलीस व मनपाच्या दंडवसुली मोहिमेमुळे नागरिक कोरोना नियमांचे पालन करत असून शहरातील सार्वजनिक उत्सव व लग्न समारंभात फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. मात्र शहरात असलेल्या सर्वच भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करताना दिसतात. 

शहरातील काही हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन केले जात असले तरी शहराजवळ व महामार्गांवर असलेल्या ढाब्यांवर मात्र रात्री गर्दी दिसते. त्यातही काही ढाब्यांवार मोकळी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मालकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे, तर काही ठिकाणी तीनतेरा वाजलेले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस