शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनावर ५६ जणांची मात; एकाच दिवशी परतले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 01:41 IST

जोशी रुग्णालयात साजरा झाला आनंदोत्सव

मीरा रोड : भाईंदरच्या जोशी रुग्णालयातून शनिवारी ५६ कोरोनामुक्त झालेल्या रु ग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे रुग्णालयात जणू आनंदोत्सवच साजरा केला. शहरातही आनंदाचे वातावरण आहे. एकूण १६१ पैकी तब्बल १०१ रु ग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे रोजचा दिवस चिंतेच्या छायेत जात असताना शनिवार मात्र शहरात आनंद घेऊन आला.भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याने दाखल असलेल्या रु ग्णांपैकी ५६ रु ग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त चंद्रकांत डांगे, उपमहापौर हसमुख गेहलोत, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब अरसूलकर यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षारक्षक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी घरी जाणाऱ्या रु ग्णांना टाळ््यांच्या गजरात निरोप दिला. रुग्णालयात मोठे आनंदाचे वातावरण होते. कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णांनीही उपस्थित सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आदींचे आभार मानले.

रुग्णालयात सर्वांनी चांगली काळजी घेतली असे सांगत अनेकांनी हात जोडून वैद्यकीय सेवा बजावणाºया या देवदूतांना अभिवादन केले.भार्इंदरच्या नारायण नगरमधील तीन वर्षांची मुलगीही आईबरोबर कोरोना मुक्त होऊन घरी गेली. पालिकेच्या रु ग्णवाहिकांमधून सर्वांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांचेही रहिवाशांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. जोशी रुग्णालय पालिकेने कोरोना रु ग्णालय जाहीर करायच्या आधीपासून येथे आवश्यक सुविधा देण्याची तयारी सुरू केली होती. पालिका प्रशासनासह आयुक्त डांगे, आमदार जैन, डॉ. अजय संख्ये, डॉ. अरसूलकर आदींनी आयसीयू, व्हेंटिलेटरची सुविधा तसेच रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टींसाठी नियोजन केले होते. डॉ. प्रफुल्ल सामंत, डॉ. तेजस्वी सोनवणे, डॉ. जाधव आदींची टीम उपचारासाठी बनवली होती. या टीमचा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कचा चांगला परिणाम असल्याचे सांगण्यात आले.आजचा दिवस शहरासाठी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. ५६ रु ग्णांना आज बरे करून पाठवले, याचा आनंद आहे. नागरिकांचे सहकार्य आहे. १०१ रु ग्ण बरे झाले असून ५७ रु ग्ण आहेत. तेही लवकर बरे होतील. - चंद्रकांत डांगे, आयुक्त

रु ग्णालयात डॉक्टरांपासून अगदी स्वच्छता करणाºया प्रत्येकाने आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रु ग्णांचे उपचार व सेवा केली. आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन काही कमी पडू दिले नाही. डॉक्टरांची समिती नियमित प्रत्येक केसनुसार चर्चा करून निर्णय घेत आहेत. कोरोना चाचणीचे विलंबाने मिळणारे अहवाल लवकर मिळू लागल्याने पटकन उपचार शक्य झाले. - डॉ. बाळासाहेब अरसूलकर, जोशी रुग्णालय प्रमुख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या