शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाण्यात २९ आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्यांची सोय, महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:41 IST

ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. आजघडीला शहरात ५२०१ अ‍ॅटिव्ह रुग्ण असून ५१२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- अजित मांडकेठाणे : कोरोना रुग्णांचे निदान तत्काळ व्हावे, त्याला वेळेत उपचार मिळावेत आणि मृत्यूदर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या प्रत्येक आरोग्यकेंद्रात आता खाजगी लॅबच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाचण्यांची संख्या वाढून ही साखळी रोखण्यातही यश मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. आजघडीला शहरात ५२०१ अ‍ॅटिव्ह रुग्ण असून ५१२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचाचणीचा वेग वाढत नसल्याने रुग्णांचे निदान वेळेत होत नव्हते. त्यामुळे अनेकांनी महापालिकेवर टीका केलीहोती.तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील स्क्रिनींग व चाचण्या वाढवा असे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.यासाठी खाजगी लॅबच्या माध्यमातून शहरातील २९ आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी आता कोरोना चाचणी केली जाणार आहे. यामुळे त्या त्या भागातील नागरीकांना आता शहरभर फिरून खाजगी लॅबचा शोध घ्यावा लागणार नाही. आता त्यांना त्यांच्या घराजवळच ही सुविधा उपलब्ध करून दिली असून तशा आशयाचे परिपत्रकही पालिकेने काढले आहे.दिवसाला होणार ३३५० चाचण्यायानुसार आता या आरोग्य केंद्रात दिवसाला ३३५० च्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. खाजगी प्रयोगशाळांच्या प्रमुखांना काही अधिकार दिले आहेत. तर प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एक ते तीन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकादेखील केल्या आहेत. तसेच उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनादेखील प्रमुख जबाबदाºया सोपविल्या आहेत. या चाचण्यांसाठी खाजगी लॅबचे दर निश्चित केले असून ते रुग्णांना द्यावे लागणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे