शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :डोंबिवलीत पत्रकार, पोलिसांची कोरोना चाचणी, उद्या अहवाल येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 20:10 IST

CoronaVirus : आज डोंबिवली येथील हेरिटेज हॉलमध्ये  पार पडलेल्या या शिबिरात एकूण 65  पत्रकारांची आणि 20 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली.

ठाणे :  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील फिल्डवर कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ICMR मान्यता असलेल्या इन्फेकशन या खाजगी लॅबद्वारे कोरोना स्बॅब तपासणी करण्यात आली. याचे अहवाल उद्यापर्यंत येणार आहेत.

आज डोंबिवली येथील हेरिटेज हॉलमध्ये  पार पडलेल्या या शिबिरात एकूण 65  पत्रकारांची आणि 20 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कल्याण - डोंबिवली - अंबरनाथ - उल्हासनगर- मुंब्रा - कळवा व ठाणे जिल्ह्यातील कोरोना वृत्तांकन करणाऱ्या सर्व खाजगी वृत्तवाहिनीमधील पत्रकार , कॅमेरामन, वृत्त निवेदक यांचा समावेश होता. तर प्रिंट मिडिया मधील अनेक पत्रकार, उपसंपादक, वार्ताहर यांनीही आजच्या शिबिराचा लाभ घेतला.

दरम्यान, गेल्या 2 आठवड्यांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन, निऑन हॉस्पिटल आणि वन रुपी क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने 8 डॉक्टरांच्या 4 वैद्यकीय पथकाने संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण 37 हजार पेक्षा अधिक नागरिकांची थर्मल स्कॅनिंगच्या माध्यमातून कोरोना पूर्व तपासणी करण्यात आली.

या कोरोना पूर्व तपासणी शिबिरात स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टरच्या भूमिकेत स्वतः फिल्ड वर नागरिकांची तपासणी करत होते.  फक्त थर्मल स्कॅनिंगवर न थांबता तपासणीत  कोरोनासदृश सर्दी,ताप,खोकला आदि लक्षणे असलेल्या 150 जणांची कोरोना कोविड तपासणी देखील खाजगी लॅबद्वारे  करण्यात आली.

आजपर्यंत एकूण 8 शिबिरांत एकूण 620 पत्रकार आणि पोलिसांच्या कोरोना तपासणी चाचण्या झाल्या असून या तपासणीत 12 पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पत्रकारांना कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस