शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:58 IST

एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. मागील १५ दिवसांत २,६६० रुग्ण सापडले असून, ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.लॉकडाऊन असेपर्यंत केडीएमसी हद्दीत रुग्णांचे प्रमाण मर्यादित होते. मात्र, ८ जूनला अनलॉक झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे शहरात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी १० वरून ३० दिवसांवर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के असले तरी, रुग्ण दुपटीचा कालावाधी ९ ते १० दिवसांचा आहे.केडीएमसी हद्दीत ९ जूनपर्यंत १,५६२ रुग्ण होते. तर, यातील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, मागील १५ दिवसांत रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. २,६६० रुग्णांमधील ७० ते ८० टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तरुणांचा वयोगट ३० ते ४५ वर्षांदरम्यानचा आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये ६२ ते ९२ वयोगटांतील व्यक्ती असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस, किडनीचे आजार आहेत.दरम्यान, बुधवारपर्यंत कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १,३१७, पूर्वेत १,०५८, डोंबिवली पूर्वेत ९१५, पश्चिमेत ५८७, मांडा-टिटवाळा-मोहने ३०७, तर, पिसवली भागात आठ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४,१९२ पर्यंत पोहोचली असून, यातील ८५ जणांचा बळी गेला आहे. तर, १,६८८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, सध्या २,४१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात दररोज ५० ते ७० पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, अनलॉक झाल्यानंतर प्रतिदिन किमान ७२ ते कमाल २५६ पर्यंत रुग्ण सापडले आहेत.अनलॉक १ मध्ये नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. सुरुवातीला केडीएमसी हद्दीतून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणाऱ्यांकडून कोरोना संक्रमित होत असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले होते. परंतु, आता शहरातील सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन केले पाहिजे. आपण प्रत्येक जण आता कोरोना योद्धा आहोत, ही भावना आत्मसात करून खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.>कोरोना चाचणीच्या प्रमाणात वाढकेडीएमसीने कल्याण-डोंबिवलीत घरोघरी ताप सर्वेक्षण तसेच कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे.सध्या प्रतिदिन ४०० ते ४५० चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याचीही संशयित रुग्णांची तक्रार आहे.खाजगी लॅबमध्ये करणाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने अहवालास विलंब होत आहे.कोरोनाची चाचणी दिल्यानंतर अहवाल मिळेपर्यंत त्यांनी घरातच क्वारंटाइन होणे महत्त्वाचे आहे.अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. नागरिकांनी नियमही पाळावे.>‘ते’ काम अंतिम टप्प्यात : रुग्णालयांत खाटांअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधींकडून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात २०० बेड उभारणीचे काम सुरू केले आहे. ते काम ९५ टक्के पूर्ण झाले. लवकरच तेथे रुग्णांवर उपचार सुरू होतील. दरम्यान, कल्याणमधील फडके मैदानातही ५५० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, अद्याप तेथे कोणतेही काम सुरू झालेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस