शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ठाण्यात कोरोनाच्या महामारीमध्ये वयोवृद्धांचे झाले सर्वाधिक मृत्यू, सत्तरीतील ज्येष्ठांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:54 IST

मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे.

- अजित मांडकेठाणे - मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे. याखालोखाल ६० ते ७० वयोगटातील ३४० जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक दिसला आहे. आजही हा धोका कायम असल्याने ज्येष्ठांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत सात लाख आठ हजार ६०० कोरोना चाचण्या झाल्या असून त्यात ५२ हजार ९४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून ५० हजार २९४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार ४४७ एवढी आहे. तर एक हजार १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये कोरोनाची लाट आल्यापासून आतापर्यंत झालेल्या या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हे वयोवृद्धांचे झाले आहेत. परंतु, काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आजही काही कामानिमित्त किंवा घरात बसायला कंटाळा आला म्हणून बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. एप्रिलमध्ये १७ तर मे मध्ये १६०, जूनमध्ये ३११, जुलैमध्ये २५५ जणांचे मृत्यू झाले होते. तर नोव्हेंबर महिन्यात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्युदर हा २.२८ टक्के एवढा आहे. दरम्यान, मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिका विविध उपाय करीत आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरात माेठ्या संख्येने काेराेनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनापुढे यावर ताेडगा कसा काढायचा असा प्रश्न उभा हाेता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे