शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

coronavirus: कल्याण स्टेशन परिसर विकासाला कोरोनाचा ब्रेक, स्मार्ट सिटी प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:32 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाला आॅगस्ट २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पांतर्गत १,४४५ कोटी रुपयांचे २५ प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांत स्टेशन परिसर विकासाला प्राधान्य दिले असून, त्यात रेल्वेस्थानक व एसटी डेपोचा कायापालट केला जाईल.

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कल्याण रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाची निविदा दीड वर्षापासून प्रक्रियेत होती. या निविदेस आता स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीने मंजुरी दिली आहे. मात्र, कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे काम सुरू होऊ शकलेले नाही. दरम्यान, कंत्राटदाराने सध्या कामगार उपलब्ध नसल्याची बाब सरकारला सांगितल्याने त्याला काम सुरू करण्यास ३१ आॅगस्टपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाला आॅगस्ट २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पांतर्गत १,४४५ कोटी रुपयांचे २५ प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांत स्टेशन परिसर विकासाला प्राधान्य दिले असून, त्यात रेल्वेस्थानक व एसटी डेपोचा कायापालट केला जाईल. पार्किंगची सुविधा, कल्याण एपीएमसीच्या जागेत मेट्रोस्थानक, कल्याण स्थानकादरम्यान विशेष मार्गिकाही तयार केली जाणार आहे. स्टेशन परिसर विकासाचा आराखडा ४९८ कोटींचा आहे. परंतु, त्याच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने त्या प्रक्रियेत वर्ष वाया गेले. स्टेशन परिसराच्या कामासाठी इच्छुक असलेल्या कंपन्या ५१८ कोटी रकमेच्या निविदा भरत होत्या. त्यामुळे निविदा रक्कम व कंत्राटदाराच्या नमूद रकमेत मोठी तफावत होती. परिणामी, निविदा मंजूर होत नव्हत्या. अखेरीस, निविदेचे मूल्यमापन करून निविदा ठरविली गेली. आता तीन कंपन्यांनी एकत्रित मिळून ४९८ कोटींची निविदा भरली असून, त्याला स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीने मान्यता दिली आहे.३१ ऑगस्टपर्यंत काम सुरू करण्यास मुभानिविदेला मान्यता मिळाली असली, तरी सध्या केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. सध्या स्टेशन परिसर रिकामा असल्याने मोठे काम करणे कंत्राटदाराला शक्य झाले असते.परंतु, कामगारांअभावी कंत्राटदाराला काम सुरू करणे अवघड झाले आहे. ही बाब त्याने सरकारला सांगितल्याने त्याला काम सुरू करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुभा देण्यात आली आहे.तोपर्यंत कोरोनाचे रुग्ण कमी होऊन लॉकडाऊन उठल्यास कंत्राटदाराला काम करणे शक्य होईल. अन्यथा, पुन्हा मुदतवाढीसाठी त्याला सरकारदरबारी धाव घ्यावी लागू शकते.

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस