शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे उडाला गोंधळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:58 IST

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून अखेर कठोर निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली आहे

मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून अखेर कठोर निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली असली, तरी मीरा-भाईंदर महापालिकेने आधी २३ मार्चपर्यंतच जीवनावश्यक वस्तू व काही सेवा वगळून सर्व दुकाने बंंद ठेवण्याचे आदेश काढले. पालिका व पोलिसांनी फिरून तशा सूचना देणे सुरू केले. परंतु, सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. परंतु, जिल्हाधिका-यांचा आदेश हाच अंतिम असून तो सरकारचा अधिकृत निर्णय असल्याने त्याचे पालन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी शहरातील पोलीस अधिकाºयांसह पालिका अधिकाºयांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये आयुक्तांनी आदेश काढून शहरातील औषधांची दुकाने, दूध, बँक, एटीएम, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णालये, दवाखाने, निदान केंदे्र, कॉल सेंटर, एटीएम व बँक वगळता अन्य सर्व दुकाने-आस्थापना शुक्रवारी सायंकाळी ५पासून २३ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे जाहीर केले. याशिवाय फेरीवाले, हातगाड्या बंदचे आदेश दिले. अन्यथा, कारवाईचा इशारा देण्यात आला होता.आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांनी तसेच कर्मचाºयांनी पोलिसांसोबत शहरात फिरून बंदचे आवाहन सुरू केले. दरम्यान, गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, चंद्रकांत जाधव आदींनी त्यांच्या भागातील कपडा, सराफा आदी व्यापा-यांच्या बैठका घेऊन दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने व्यापा-यांनी दुकाने शुक्रवारपासून बंद केली होती. त्यामुळे शहरात आजपासूनच व्यापाºयांच्या सहकार्याने दुकाने बंद झाल्याने शुकशुकाट जाणवत होता.आयुक्तांच्या आदेशानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा आदेश आला. त्यात ३१ मार्चपर्यंत दूध डेअरी, औषधांची दुकाने, किराणा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश जारी झाला आहे. तसेच हॉटेल, बीअर बार, वाइन शॉपही बंद असतील. परंतु, त्यातील केवळ हॉटेलमधून जेवण पार्सल घेऊन जाणे यासाठीच फक्त सवलत दिलेली आहे. त्यामुळे मद्यविक्री वा पार्सल देता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. किराणा, दूध, भाजीपाला, औषध दुकानांत स्वच्छता ठेवण्यासह नागरिकांकरिता हॅण्डवॉश व सॅनिटायझर ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असल्याने त्यांच्या आदेशाचीच काटेकोर अंमलबजावणी करणे पालिका व पोलीस प्रशासनासह सर्वांनाच बंधनकारक असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस