शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिलासादायक! ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट; आज सापडले केवळ 881रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 20:27 IST

आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख 14 हजार 765 रुग्णांची तर तीन हजार 268 मृतांची नोंद झाली आहे.  

ठाणे - जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. रविवारी केवळ 881 रुग्णांचा शोध लागला तर फक्त 28 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात घेण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख 14 हजार 765 रुग्णांची तर तीन हजार 268 मृतांची नोंद झाली आहे.  आज ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 130 रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात 24 हजार 459 रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. याशिवाय आज फक्त पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 787 मृतांची नोंद ठाणे परिसरात झाली. तर कल्याण - डोंबिवली मनपा क्षेत्रात 218 रुग्णांची आज नोंद झाली असून आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत 26 हजार 623 रुग्ण बाधीत झाल्याची तर 556 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात 316 रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे. या शहरात आतापर्यंत 23 हजार 321 बाधितांची तर 542 मृतांची संख्या झाली आहे. उल्हासनगर परिसरातही 19 रुग्ण तर चार मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत जणांच्या मृत्यूसह सात हजार 585 रुग्णांची आणि 209 मृतांची नोंद उल्हासनगरला झालेली आहे. सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या या शहरात देशभरात रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

भिवंडी मनपा क्षेत्रात गेल्या 24 तासात एकही दगावला नसून केवळ 13 रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात चार हजार 62 बाधितांची संख्या असून मृतांची संख्या 281 झाली आहे. मीरा भाईंदरला 77 रुग्णांची तर, चार जणांच्या मृतांची नोंद आज झाली आहे. या शहरात बाधितांची संख्या 11 हजार 596 असून 390 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये 32 रुग्णांची वाढ झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. आता बाधितांची संख्या चार हजार 697, तर, मृतांची संख्या 181 झाली आहे. बदलापूरमध्ये 32 रुग्णांची नोंद आज झाल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार 813 झाली. या शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची 65 ही संख्या कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांत 44 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या आठ हजार 603 तर मृत्यू 258 वर गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे