शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

coronavirus: भिवंडीत काळाबाजार करणाऱ्यांचे पोलिसांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:28 AM

लॉकडाऊनच्या काळात शहरात एकाने व्हिडीओ क्लिप बनवली व भिवंडी पोलिसांना कारवाईचे आव्हान देत गुटखा व तंबाखू सिगारेट विकला. यावरून हा काळाबाजार करणाऱ्यांचे हात किती वरपर्यंत पोहोचले आहेत, याचा अंदाज येतो.

- नितीन पंडितभिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात गुटखा तंबाखू व सिगारेट विकला गेला. विशेष म्हणजे ग्रामीण भागासह शहरात दाटीवाटीच्या व मुस्लिमबहुल परिसरात मुख्यत्वे ही विक्री झाली. आता पुन्हा याच परिसरात हा गोरखधंदा फोफावेल, अशी शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात एकाने व्हिडीओ क्लिप बनवली व भिवंडी पोलिसांना कारवाईचे आव्हान देत गुटखा व तंबाखू सिगारेट विकला. यावरून हा काळाबाजार करणाऱ्यांचे हात किती वरपर्यंत पोहोचले आहेत, याचा अंदाज येतो. ही क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भिवंडी पोलिसांच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली गेल्याने परिसरातील तंबाखू, गुटखा सिगारेट विकणाºयांना पकडून चांगलाच चोप दिला. लॉकडाऊन काळात सर्वाधिक गुटखा व तंबाखू भिवंडीत विकला गेला. कारण भिवंडीतील अनेक गोदामांमध्ये गुटखा, तंबाखु व तंबाखू जन्य पदार्थांची साठवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. लॉकडाऊनच्या काळात तब्बल तीन वेळा भिवंडीत अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला होता. त्यात लाखोंचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला होता. एका कारवाईत तर चक्क सॅनिटायझरच्या कंटेनरमधून गुटखा जप्त करण्यात आला होता.  गुटखा, तंबाखूची गोदामे असल्याने गोरखधंद्याचे ठरले केंद्रलॉकडाऊनमध्ये पानटपºया बंद असल्या तरी अनेक पानटपरीधारकांनी फोनद्वारे आपला गुटखा, तंबाखू विकण्याचा धंदा सुरूच ठेवला होता. या काळात चढ्या दराने गुटखा व तंबाखू , सिगारेटची विक्र ी झाली.लॉकडाऊन अगोदर जे सिगारेट पाकीट २० ते ३० रु पयांना मिळत होते ते भिवंडीत 300 रु पयांना विकले गेले.तर तंबाखूची सात रु पयाला मिळणारी पुडी 40-50 रु पयांना विकली गेली.१०रु पयाची सुटी तंबाखू ३५ रु पये दराने विकली गेली.त्याचबरोबर १० रुपयांचा गुटखा लॉकडाऊनमध्ये 20 रु पयाला विकला गेला.सात रु पयांचा गुटखा 20 रुपये दराने विकला गेला.१० रु पयाला मिळणारा गुटखा 30 रु पयाला महागडा गुटखा जो अगोदर २५ रु पयाला मिळायचा तो 60 रु पये दराने विकला गेला.आता पुन्हा तसेच सुगीचे दिवस येणार या कल्पनेने विक्रेते काळाबाजार करू लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी फोनवर व ग्राहकांना स्वत: भेटून गुटखा व तंबाखू चढ्या दराने विकला व त्याचा लॉकडाऊन काळात व्यवसाय म्हणून उपयोग केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार