शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

coronavirus: अंबरनाथचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 18:48 IST

अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

अंबरनाथ - करोना नियंत्रणासाठी अंबरनाथ शहरात नगर परिषदेच्या वतीने बाधितांचा वेळीच घेतलेला शोध, आग्रही चाचणी, अलगीकरण आणि विलगिकरण यंत्रणेची यशस्वी नियोजन आणि बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार नियोजनामुळे अंबरनाथ शहरात रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 90 टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद संचलित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 96 टक्क्यांवर गेला आहे. तर येथील रुग्णालयाचा मृत्यूदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे.  अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात आजपर्यंत एकूण 11 हजार 452 कोव्हिडं चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शहरात एकूण 4 हजार 502 बाधित रूग्ण आढळले आहेत. शहरातील एकूण रूग्णांपैकी तब्बल 4 हजार 79 रूग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर शहरात एकूण 174 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.अंबरनाथ नगरपरिषद संचालित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आजपर्यंत 2 हजार 54 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील एकूण 1 हजार 980 रुग्ण हे उपचारार्थी बरे होऊन घरी परतले आहेत.  या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल 96 टक्के इतका आहे. मागील दोन महिन्यात या रुग्णालयात 4  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हा दर अवघा 0.19 इतका आहे. यासोबतच शहरातील एकूण रूग्णांचा बरे होण्याचा दरही 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र शहरातील कोरोनाचा मृत्यू दर हा अजूनही पालिकेची चिंता वाढविणारा आहे. हा मृत्यू दार कमी करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यासोबत बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात असल्याने संसर्गाचे प्रमाण काही अंशी रोखण्यात यश येताना दिसते आहे. - प्रशांत रसाळ,  मुख्याधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याambernathअंबरनाथ