शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठामपाचे 70 टक्के आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 13:38 IST

आपल्या जीवाची काळजी न करता काम करणार्‍या डॉक्टर्ससह या आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने तर दिली जातच नाहीत; शिवाय त्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता 70 टक्के आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

ठाणे  - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. या कोरोनाच्या महामारीमध्ये जीवावर उदार होऊन सेवा बजवणार्‍यांचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “कोविड योद्धा” असा केला आहे. मात्र, सैन्य रसदेवर चालते, याचाच विसर ठाणे महानगर पालिकेला पडला असल्याचे दिसून येत आहे. आपल्या जीवाची काळजी न करता काम करणार्‍या डॉक्टर्ससह या आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने तर दिली जातच नाहीत; शिवाय त्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता 70 टक्के आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या सर्व प्रकाराला ठामपाचे मुख्य आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर हेच जबाबदार असल्याने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.    कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करुन आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. ठाणे पालिकेच्या सेवेते कार्डीया रुग्णवाहिका चालविणारे 26 चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही.तर, सुमारे 200 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. तसेच, विविध आरोग्य केंद्रातील नर्स, वॉर्ड बॉय हे कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे, स्क्रिनिंग आदी कामे करीत आहेत. तर, विविध आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स प्रचंड धोका पत्करुन थेट रुग्णांच्या संपर्कात जात आहेत. त्यांनाही वेतन देण्यात आलेले नाही. उष्मा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाही कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. जो भाग प्रतिबंधीत (कॅन्टोन्मेंट) केला आहे. तेथेही हे कर्मचारी जीवावर उदार होऊन जात आहेत. त्यांना साधा एन 95 चा मास्कही दिला जात नाही. साधा एक मास्क दिला जात आहे. हँडग्लोव्हज, हँडसॅनिटायझर, सर्जिकल कॅप किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची साधने दिली जात नाहीत. त्यातच विभागांमध्ये विविध आरोग्य सर्व्हे करणार्‍या नर्स या 45 वयाच्या पुढील आहेत. हा सर्वे केल्यानंतर त्या थेट आपल्या घरात जात आहेत. तर डॉक्टर्ससाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर आवश्यक असतानाही त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही.  त्यामुळे त्यांच्यासह या नर्स आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्याची कोणतीही जाणीव डॉ. माळगावकर यांना नाही. या कर्मचार्‍यांना वेतनही अदा केले जात नाही. त्यामुळे डॉक्टर्ससह गोरगरीब नर्स, आशा स्वयंसेविका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक, यांच्या जीवाशी खेळणार्‍या डॉ. माळगावकर यांना ठामपाच्या सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी मिलींद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे