शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने झाले सुरू, कच्च्या मालाची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 03:16 IST

डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत.

- मुरलीधर भवारडोंबिवली : तब्बल ४४ दिवसांच्या लॉकडाउननंतर डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरू झाले आहेत. मात्र या कारखान्यांना कच्चा माल मिळत नसल्याने कारखाने सुरू होऊनही उत्पादनाला हवी तशी गती मिळालेली नाही. त्यात कंत्राटी परप्रांतीय कामगार गावी गेल्याने डोंबिवलीतील कारखानदारांना उत्पादन सुरु करताना अडथळे येत आहेत.डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत. लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच प्रदूषण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला होता. या कारवाईच्या निषेधार्थ लॉकडाउन होण्यापूर्वीच सर्व कारखानदारांनी उत्पादन बंद आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरानामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्चला देशात लॉकडाउन लागू झाला. ४४ दिवसानंतर काही अटी शर्तीच्या आधारे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ४२० कारखान्यांपैकी केवळ ६० कारखाने सुरु झाले. परंतु कारखानदारांना कच्चा माल नियमित मिळत नाही. त्यामुळे कारखाना सुरु होऊनही उत्पादन घेता येत नाही.टेक्सटाइल कारखान्यांमध्ये बहुतांश कंत्राटी कामगार असून त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात रोजगार नसल्याने उपासमारीला कंटाळून परप्रांतीय कामगार गावी निघून गेले. त्यामुळे टेक्सटाइल कारखान्यांमध्ये कामगारांची वानवा आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत जोशी यांनी दिली.कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने कारखानदारांवर सर्व जबाबदारी टाकली आहे. लघु उद्योगजकांना सरकारने काही पॅकेज जाहीर केले तरच ते तग धरू शकतील.सरकारने उद्योजकांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अन्य उद्योजक उद्योग सुरू करणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी त्यांचे काम सुरु केलेले नाही. लॉकडाउनमुळे नाशिक व पुण्याहून येणारा कच्चा माल येत नाही. त्यात लोडिंग कामगार हे परगावी गेल्याने पंचाईत झाली आहे. कारखानदार टप्प्याटप्प्याने कारखाने सुरू करणार आहे. सध्या ६० कारखाने सुरू झाले आहेत. बाजारात खेळत्या भांडवलाची टंचाई आहे. त्यामुळे पगार कसा करायचा, कच्चा माल कधी उपलब्ध होणार, उत्पादन तयार केल्यास त्याला उठाव मिळणार की नाही, या विवंचनेत कारखानदार आहेत.- देवेन सोनी, अध्यक्ष, कामा संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाMIDCएमआयडीसी