शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात ७ रुग्ण वाढले; एकूण कोरोना बाधितांची संख्या १५वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 19:58 IST

शहरातील नागरिकांनी अजूनही गांभीर्याने घेत घरा बाहेर निघणे बंद केले नाही, तर परिस्थिती बिकट होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ७ रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली आहे. भाईंदरमध्ये काल कोरोना झालेल्या महिलेचा पती, मुलगा, सून व ३ वर्षांची नात हे देखील कोरोना बधीत झालेली आहे. अजुनही तब्बल ३२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल यायचे आहेत. कोरोना रुग्णांची संख्या १५ झाली असुन पालिका आयुक्त चंद्रखांत डांगे यांनी पोलीस, पालिका अधिकारायांची तातडीची बैठक सायंकाळी बोलावली. शहरातील नागरिकांनी अजुनही गांभीर्याने घेत घरा बाहेर निघणे बंद केले नाही तर परिस्थीती बिकट होण्याचा धोका निर्माण झाला आहे असे वैद्यकिय सुत्रांनी सांगीतले.शनिवार पर्यंत शहरात ८ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. अवघ्या २४ तासात त्यात ७ रुग्णांची भर पडली आहे. पालिकेच्या भार्इंदर येथील जोशी रुग्णालयात ९ कोरोना रुग्णांसह एकुण ३२ जणांना दाखल केलेले आहे. तर कस्तुरबा मध्ये ३, कोकीळाबेन मध्ये २ व सेव्हन हिल्स मध्ये १ रुग्ण दाखल आहे. अजुन ३२ जणांचे कोरोनाचे चाचणी अहवाल आलेले नाहित. आता पर्यंत पडताळणी झालेले ८२५ लोकं असुन ५२० जणं पालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या देखरेखी खाली आहेत.कानुगो इस्टेट मध्ये एकाच कुटुंबाती ५ रुग्ण आढळल्यावर मीरारोडच्या मेडतीया नगर मध्ये एक रुग्ण सापडला होता. मेडतीया नगर मध्ये सापडलेला रुग्ण ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीच्या रखवालदारास कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी भार्इंदरच्या नारायण नगर व एसव्ही मार्ग येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. नारायण नगर मधील महिलेचा आता पती, मुलगा, सून व ३ वर्षाची नात यांना सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे आज आढळुन आल्याने एकाच घरात ५ जणांना कोरोना झाला आहे.मीरारोडच्या आरएनए ब्रॉड वे एव्हेन्यु मध्ये महिलेला कोरोनाची लागण झाली असुन ती कानुगो इस्टेट भागात तीच्या माहेरी आई कडे येत जात होती. कानुगो भागातच पहिले ५ रुग्ण सापडले होते. सदर महिलेच्या सासरचे तसेच माहेरच्या लोकांना सुध्दा जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. मीरारोडच्या नित्यानंद नगर भागात कोरोनाची लागण झालेला रुग्ण सापडला असुन तो टॅक्सी चालक आहे. राजवाडी मध्ये कोरोना झाल्याने दाखल त्याच्या टॅक्सी चालक मित्राच्या तो संपर्कात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस