शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 477 नविन रुग्णांची भर:  14 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 22:33 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात 7 जून रोजी 138 कोरोना बाधितांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार 57 तर, मृतांचा आकडा 116 वर पोहोचला.

ठाणे - ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने रविवारी कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 477 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. दरम्यान 14 रु ग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 11 हजार 359 तर, मृतांचा आकडा 366 इतका झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 7 जून रोजी 138 कोरोना बाधितांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार 57 तर, मृतांचा आकडा 116 वर पोहोचला. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेत 115 रु ग्णांची नोंद झाली. याठिकाणी एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधीतांचा आकडा दोन  हजार 886 तर, मृतांची संख्या 89 वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवलीत 29 रु ग्णांची नोंद झाली असून त्याठिकाणी दोघांचा मृत्यू झाला.याठिकाणी एक हजार 418 कोरोनाबाधित असून  मृतांचा आकडा 40 झाला. तर मीरा भाईंदरमध्ये 34 नविन रु ग्णांच्या नोंदीसह चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या 983 तर, मृतांची संख्या 55 वर गेली आहे. भिवंडीमध्ये 18 रु ग्णांच्या नोंदीसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची 261 तर, मृतांची संख्या 16  वर गेली. उल्हानगरमध्ये 83 रु ग्णांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. याठिकाणी बाधितांची संख्या 579 तर, मृतांची संख्या 23 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 17 रु ग्णांची  नोंद झाल्याने बाधितांची संख्या 309 झाली. तर, अंबरनाथमध्ये 33 रु ग्णांची नोंद झाली असून बाधितांचा संख्या 356 वर गेली आहे. ठाणे ग्रामीण भागात 10 रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा संख्या 502 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे