शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात आढळले आणखी ४४ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 00:55 IST

आकडा पोहोचला ३६४ वर; मृतांची संख्या झाली १२

ठाणे : ठाणे आणि कल्याण- डोंबिवली या महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना शनिवारी अचानक या दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह रु ग्ण अनुक्रमे १५ आणि १३ ने वाढले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६४ इतकी झाली आहे. त्यातच ठामपामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दगावणाऱ्यांची संख्या १२ वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्णांमुळे चिंता कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे.ठामपा हद्दीत शनिवारी आढळलेल्या १५ रुग्णांमध्ये मुंब्य्रातील आठ जण असून पांचपाखडी, टेकडी बंगला आणि वर्तकनगर येथे प्रत्येकी २ तसेच घाणेकर हॉल आणि लोकमान्यनगर येथे प्रत्येकी १ असे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामध्ये १० महिला असून ५ पुरुष आहेत. या सर्वांचे वय हे १६ ते ६३ यामधील आहे. नव्याने वाढलेल्या १५ रुग्णांमुळे ठामपा क्षेत्रातील रुग्णांची संख्या १३० इतकी झाली आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये डोंबिवलीतील १२ जण असून एक कल्याण येथील आहे. त्यात ७ महिला आणि ६ पुरुष असून एक वर्षाच्या मुलीपासून ७० वर्षीय आजीबार्इंचा समावेश आहे. या रुग्णांमुळे केडीएमसी क्षेत्रातील रुग्णांची संख्या एकूण ७३ झाली आहे. त्यातील २६ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. मीरा भार्इंदर येथे नवे १० रुग्ण सापडले आहेत. तर ठाणे ग्रामीण व बदलापूर येथे प्रत्येकी २ आणि नवी मुंबई व अंबरनाथ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.ठाणे पालिका कर्मचाºयाला कोरोनाची लागणकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन रात्रंदिवस डोळ्यांत तेल टाकून काम करीत आहे. मात्र, आता महापालिकेच्या परवाना विभागातील कर्मचाºयालाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे ठाण्यात शनिवारी आणखी एका ५७ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची मााहिती पालिकेने दिली आहे. गार्डन इस्टेट या भागात हा रुग्ण वास्तव्यास होता. त्याच्यावर हॉराईझन रुग्णालयात उपचार सुरूहोते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना यापूर्वी अर्धांगवायूचा झटका येऊन गेला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसांत गुणाकाराने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कधी पाच तर कधी १०, १५, २० अशा संख्येने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. आजघडीला शहरात कोरोनाचे १२० च्या आसपास रुग्ण आहेत. तसेच होम क्वॉरंटाइन केलेल्या रुग्णांची संख्याही शेकडोत आहे. महापालिकेच्या विलगीकरण कक्षातही १०० हून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. एखाद्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिका संबंधित ठिकाणचा जवळजवळ एक किमीचा परिसर सील करीत आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाइन करते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या