शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

coronavirus: ठाणे जिल्ह्यात गुरुवारी सापडले कोरोनाचे ४३५० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:52 IST

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही गुरुवारी चिंताजनक वाढ झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार हजार ३५० ने वाढले तर १८ जण दगावले. जिल्ह्यात आता तीन लाख २३ हजार ३६१ रुग्णसंख्या असून मृतांची संख्या आजपर्यंत सहा हजार ५१० झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही गुरुवारी चिंताजनक वाढ झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार हजार ३५० ने वाढले तर १८ जण दगावले. जिल्ह्यात आता तीन लाख २३ हजार ३६१ रुग्णसंख्या असून मृतांची संख्या आजपर्यंत सहा हजार ५१० झाली आहे. ( 4350 corona patients found in Thane district on Thursday)ठाणे शहरात एक हजार ४३२ नवे रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या ७९ हजार ३२८ झाली आहे. ठाण्यात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १ हजार ४५३ एवढी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ८९८ नव्या रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू झाले. आतापर्यंतची रुग्णसंख्या ८० हजार ७१ असून एक हजार २५९ मृत्यूची नोंंद झाली आहे.उल्हासनगरमध्ये २१८ नवे रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १७ हजार ७४ झाली. तर, ३७९ मृतांची नोंद आहे. भिवंडीत ५२ नवे रुग्ण आढळले असून तीन मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत बाधित सात हजार ७३६ असून मृतांची संख्या ३६३ आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३५३ नवे रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरांतील बाधितांची संख्या ३० हजार ९८७ असून मृतांची संख्या ८२७ झाली आहे. अंबरनाथमध्ये १७२ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधित ११ हजार २८ असून मृत्यू ३१९ झाले आहेत. बदलापूरमध्ये १७७ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १२ हजार १६७ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ कायम आहे. ग्रामीण भागामध्ये ७७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. एकूण बाधित २१ हजार ९० असून आतापर्यंत ६०८ मृत्यू नोंदले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे