शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

coronavirus: अंबरनाथमधील कोविड रुग्णालयात 34 बेड शिल्लक, वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 02:59 IST

coronavirus in Ambernath : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे अवघे ३४ बेड शिल्लक राहिले असून, येत्या दोन दिवसांत तेही भरले जाणार आहेत.

अंबरनाथ  - अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे अवघे ३४ बेड शिल्लक राहिले असून, येत्या दोन दिवसांत तेही भरले जाणार आहेत. त्यामुळे वाढीव रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.  अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने जांभूळ गाव येथील डेंटल महाविद्यालयात ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. एका दिवसात तेही भरणार असल्याने शहरातील वाढत्या रुग्णाला संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यायी रुग्णालयाची गरज भासत आहे. कोविड रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्याने आता कोविडमुळे गंभीर झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी उपचार केले जात आहेत, तर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना अवघ्या तीन ते चार दिवसांतच घरी सोडण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही अंबरनाथ शहर आणखी २०० ते २५० शे बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.डेंटल महाविद्यालय याव्यतिरिक्त आता अंबरनाथ पालिकेने उभारलेल्या यूपीएससी सेंटरमध्येही २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने काम करण्याची सूचना खासदार  शिंदे यांनी दिले. या ठिकाणी ३० बेडचे आय सीयू सेंटरही उभारले जाणार आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने ५०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी या ठिकाणी आयसीयू कक्ष आणि व्हेंटिलेटरची कोणतीही सुविधा नाही, त्यामुळे अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.  ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे. बदलापूर पालिकेने सुरू केला ३० बेडचा आयसीयू कक्ष  बदलापूर : बदलापूर नगरपालिकेने गौरी हॉल येथे उभारलेल्या २५० बेडच्या ऑक्सिजन कक्षात आता ३० बेडचा आयसीयू कक्ष उभारला आहे. त्यात ३० पैकी १० बेड हे व्हेंटिलेटरचे असतील. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष उभारण्यात आला आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे, अशांवरही याठिकाणी उपचार केले जाणार आहेत. गौरी हॉल येथे रुग्णालय उभारल्यानंतर त्या काळात रुग्णांची संख्या घटली होती. बदलापूर पालिकेने या ठिकाणी उपचार सुरू ठेवल्याने आता त्याचा फायदा कोरोनाची दुसरी लाट आल्यावर झाला आहे.     बदलापूर पालिकेने रेनी रिसॉर्ट येथील सभागृहात आणि जान्हवी लॉन्स येथील सभागृहात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्याची तयारीही सुरू केली आहे. त्या ठिकाणी बेडही उपलब्ध केले आहेत. रुग्ण वाढल्यावर या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथ