शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

coronavirus : धोक्याची घंटा, ठाणे महापालिका हद्दीत आठवडाभरात ३०१ रुग्ण, झोपडपट्टीत प्रमाण जास्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 03:51 IST

मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे.

ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत ६५० च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. यामध्ये गेल्या आठवडाभरात तब्बल ३०१ रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मागील काही दिवसांत ३० ते ६५ रुग्ण एका दिवसात वाढले असून झोपडपट्टीतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे. सुरुवातीला सोसायटीमध्ये काही प्रमाणात रुग्ण आढळत होते. परंतु, एप्रिलअखेरपासून कोरोनाने झोपडपट्टीत शिरकाव केल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लोकमान्यनगर-सावरकरनगर आणि वागळे या दोन प्रभाग समित्यांत या दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून या दोन प्रभाग समित्यांमध्येच कोरोनाचे २५० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. वागळे प्रभाग समितीत आजघडीला ११० हून अधिक तर लोकमान्यनगरमध्ये १६० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, नौपाडा आणि कोपरीतही ही संख्या ६० च्या वर गेली आहे. मुंब्य्रात हे प्रमाण ८० पर्यंत आले आहे. परंतु, इतर प्रभाग समित्यांच्या तुलनेत लोकमान्यनगर आणि वागळे या पट्ट्यात झोपडपट्टी भागातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, उल्हासनगरमध्ये १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. सम्राट अशोकनगरमधील कोरोना संसर्ग झालेल्या महिलेच्या संपर्कातील तब्बल ११ जणांना कोरोना झाला आहे. तसेच शांतीनगर येथील पोलिसाच्या संपर्कातील दोघे, चोपडा कोर्ट येथील दोघे, गोलमैदान येथील एकाला असा १७ जणांना संसर्ग झाला आहे. शहापूरमध्ये कोरोनाचे नवे पाच रुग्ण शहापूर : शहापूर तालुक्यात शनिवारी नवे पाच रुग्ण आढळले. शहापूरमध्ये २, किन्हवलीत १ आणि वासिंदमध्ये २ रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. भिवंडीत नवा रुग्ण भिवंडी : येथील ग्रामीण भागात असलेल्या काल्हेर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. काल्हेर येथील गोदामपट्ट्यात हा रुग्ण चहाविक्री करतो, असे सांगण्यात आले. बदलापूरमध्ये तीन रुग्णबदलापूर : शहरात शनिवारी तीन  रुग्ण आढळले. त्यातील दोघे  मुंबईच्या रुग्णालयात काम करतात. तर, एक ६४ वर्षीय महिला आहे.  कात्रप येथील एका ५५ वर्षीय सफाई कामगारालाही लागण झाली आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेtmcठाणे महापालिका