शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: २४ हजार कामगारांना घरी जाण्याची ओढ; जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:17 IST

२,३१५ मजूर रेल्वेने रवाना, गावी जाण्यासाठी सर्वांच्या विनवण्या

सुरेश लोखंडे  

ठाणे : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र सुरू असून त्यात २४ हजार २९२ मजूर, कामगार, दिव्यांग नागरिक, निराधार व्यक्तींना आश्रय दिलेला आहे. आता सरकारच्या नव्या आदेशामुळे तब्बल एक ते दीड महिन्यांपासून वास्तव्याला असलेल्या या लोकांना घरी जाण्याची ओढ लागली आहे.

सरकारच्या आदेशानुसार भिवंडी शहर व पसिरातील दोन हजार ३१५ कामगार, मजूर रेल्वेने त्यांच्या युपी, बिहारमधील गावी गेले आहेत. त्यांच्यासाठी खास रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय त्या आणखी सोडाव्यात, पर्यायी व्यवस्था करावी किंंवा जाण्याची परवानगी देण्याची मागणी निवारा केंद्रातील प्रवासी, कामगार, मजुरांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांची ठिकठिकाणच्या निवारा केंद्रात भोजन व निवास व्यवस्था केलेली आहे. सेवाभावी संस्थांकडूनदेखील ठिकठिकाणी भोजन, निवास व्यवस्था केली जात आहे. जिल्हा परिषदेने व मुरबाड नगरपंचायतीने पाच ठिकाणी निवारा केंद्रात १४६ जणांची सोय केली आहे. तर शहापूरमध्ये दोन ठिकाणी ७८ जणांची सोय केली आहे.

कसारा येथेही दोन क्वारंटाइन सेंटर असून आहेत. शिरोळ आश्रमशाळेत ४६ जण व खर्डी ते कसारा घाटापर्यंत पायी जाणाऱ्या प्रवाशांना ४५ दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापन हॉट्सअ‍ॅप ग्रुप दररोज एक हजार लोकांना जेवण देत आहे. या व्यक्ती गोंदिया, चंद्रपूरसह राज्यातील त्यांच्या गावी जाण्यासाठी रोज विनंती करीत आहेत.कल्याणच्या ग्रामीण भागात बदलापूरच्या बीएसयूपीच्या इमारतीत २० बेडचा क्वारंटाइन कक्ष आहे. तेथे १५ जण होते. भिवंडी बायपासच्या टाटा आमंत्रामध्ये ६५ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले होते.या संचारबंदीत म्हारळगांव, वरप, कांबा परिसरात 1600 मजुरांना ग्रामपंचायतींनी अन्नधान्य वाटप केले. या मजुरांना गावी जाण्यासाठी म्हारळ येथे मंगळवारी  355 तर कांब्याला ४२७ आणि वरपला मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने जिल्ह्यातील या निवारा केंद्रांना फूड पाकीट पुरवठा व भोजन व्यवस्था सुरू आहे. याशिवाय शासनाची शिवभोजन थाळी या अडकलेल्या व्यक्तींना पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यातील या सर्व निवारा केंद्रांवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून संबंधितांकडून दैनंदिन आढावा घेत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस