शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

coronavirus: ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या १८००६९ रुग्णांची नोंद; शनिवारी ३२ जणांचे मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 20:54 IST

corona virus Thane News:जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आज ३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ५५९ झाली आहे

ठाणे  - जिल्ह्यात शनिवारी एक हजार ५५१ नवे रुग्णं आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आज ३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ५५९ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासह अंबरनाथ, बदलापूर परिसरामध्ये आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.ठाणे शहर परिसरात आज ४०२ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ३७ हजार ९७५ रुग्णांची नोंद केली आहे. तर, आज आठ मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या एक हजार १८ नोंदवण्यात आली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात २७७ नवीन रुग्ण आढळून आले असून सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३९२ रुग्ण बाधीत झालेले असून मृतांची संख्या ८४४ झाली आहे.उल्हासनगर क्षेत्रात आज ६२ रुग्ण सापडले आहेत. तर, तीन मृत्यू झाले आहेत. येथे आतापर्यंत नऊ हजार ३४९ रुग्ण संख्या झाली असून मृतांची संख्या ३०६ झाली आहे. नवी मुंबईला ३९९ रुग्णांची तर, सात मृतांची आज नोंद झाली आहे. या शहरात आतापर्यंत बाधीत ३७ हजार ८१७ झाले असून मृतांची संख्या ७७० नोंदवण्यात आली आहे.भिवंडी मनपा क्षेत्रात २८ बाधीत आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच हजार १५६ बाधीत असून मृतांची संख्या ३१३ झालेली आहे. मीरा भाईंदरमध्ये २०० रुग्णांची तर आज सात मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात १९ हजार ७० बाधितांसह आता मृतांची संख्या ५८७ झाली आहे.अंबरनाथमध्ये ६८ रुग्णं सापडले असून आज एकाही मृताची नोंद नाही. आता बाधितांची संख्या सहा हजार ४५१ असून मृत्यू २३१ कायम आहेत. बदलापूरमध्ये ६६ रुग्णांचा शोध नव्याने लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ३३६ झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झाला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ४९ रुग्ण आज सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. या ग्रामीण क्षेत्रात बाधितांची संख्या १४ हजार ५२३ झाली असून मृतांची संख्या ४१३ आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे