शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख चढा; शुक्रवारी १७४७ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 02:49 IST

CoronaVirus Thane News: दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

ठाणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी तब्बल एक हजार ७४७ ने वाढ झाली असून आतापर्यंत एक लाख ८९ हजार ६१ व्यक्तींना लागण झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या चार हजार ७७७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे शहरात ४०० नवे रुग्ण आढळले. परिणामी, शहरात आतापर्यंत ४० हजार ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात ठाण्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत शुक्रवारी ३६७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचे मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरात ४१ नवे रुग्ण आढळले असून, एकाचा आज मृत्यू झाला. भिवंडीला ४३ नवे रुग्ण आढळून आले. भिवंडीतील एकूण रुग्णसंख्या पाच हजार ३६० असून मृतांची संख्या ३२२ आहे. मीरा-भार्इंदरमध्ये नव्या १९५ रुग्णांची तर, सात मृत्यंूची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ५२ नवे रुग्ण सापडल्यामुळे आता बाधित सहा हजार ६२६ आहेत.वसई-विरारमध्ये आठ रुग्णांचा मृत्यूवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शुक्रवारी दिवसभरात १६४ नवे रुग्ण आढळून आले असून चिंताजनक म्हणजे दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात एकट्या वसईत सहा आणि नालासोपारात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.रायगडमध्ये ३२९ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी दिवसभरात ३२९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४९ हजार ९६६ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.नवी मुंबईत ८९ टक्के रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४३३ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३५,४१३ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. शुक्रवारी ३५६ नवीन रुग्ण वाढले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या