शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 13 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:59 IST

नव्याने आढळून आलेल्या 13 रुग्णांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 झाली आहे.

ठळक मुद्देनव्या 13 रुग्णांमध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश डोंबिवली पश्चिमेत तीन महिला व तीन पुरुषांना कोरोनाची लागण कल्याण पश्चिमेतील 65 वर्षीय वृद्धाला लागण

कल्याण - कल्याणडोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. आज एकाच दिवशी 13 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 12 रुग्ण हे डोंबिवलीतील आहे. एक रुग्ण हा कल्याणमधील आहे. डोंबिवली कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 13 रुग्णांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 झाली आहे. नव्या 13 रुग्णांमध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.1 वर्षाच्या मुलीस कोरोनाची लागण झाली आहे. ती डोंबिवली पश्चिमेत राहणारी आहे. या एक वर्षाच्या मुलीसह डोंबिवली पश्चिमेत तीन महिला व तीन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील तीन महिला व तीन पुरुषांना लागण झालेली आहे. हे सगळे जण कोराना बाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कल्याण पश्चिमेतील 65 वर्षीय वृद्धाला लागण झाली आहे. त्यांचा परदेश गमनाचा इतिहास आहे. कल्याण डोंबिवलीत दररोज नवे रुग्ण मिळून येण्याची संख्या 1 ते 6 या दरम्यान होती. त्यात आज अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. आत्तार्पयत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 26 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 45 आहे. 45 पैकी 11 रुग्ण हे नियॉन या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे खाजगी रुग्णालय कोरोनासाठी डेडीकेटेट रुग्णालय घोषित केले आहे.घरी राहा असे आवाहन वारंवार केले जात आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी आयुक्त, पोलिस, बाजार समितीकडून विविध आदेश काढून उपाययोजना केल्या जात आहे. तरी देखील लोक घरी राहण्याच्या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद देत नाहीत. काही टूकार मंडळी सरकारी नियमांचा भंग करीत आहे. तसेच काही जणांकडून सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही. त्यामुळे डोंबिवलीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्या तरी लागण टाळणे याची खबरदारी नागरीकांनी घेणे आवश्यक आहे. ती घेतली जात नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली