शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण; पोलीस, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 18:54 IST

CoronaVirus : नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांपैकी डोंबिवली पूर्वेतील 30 व 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झालेली आहे.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 129  झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचा-याचा समावेश आहे.

नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांपैकी डोंबिवली पुर्वेतील 30 व 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झालेली आहे. कल्याण पूर्वेतील 43 वर्षे महिलेलाही कोरोना झाला आहे. हे तिघेही मुंबई येथे आरोग्य कर्मचारी आहेत. त्याचबरोबर टिटवाळ्य़ातील 52 वर्षीय आरोग्य कर्मचारी असलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. मांडा टिटवाळ्य़ातील 12 वर्षीय  मुलगी, डोंबिवली पश्चिमेतील 50 वर्षीय महिलाही व 30 वर्षीय तरुण हे तिघे कोरोना रुग्णाच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कल्याण पूर्वेतील व डोंबिवली पूर्वेत राहणा-या दोन पोलिसांना कोरोना झाला आहे. डोंबिवली पूर्वेतील मुंबई येथे कार्यरत असलेल्या 30 वर्षीय पत्रकारासही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय डोंबिवली पश्चिमेतील 16 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. त्याचबरोबर 45 वर्षीय इसमाला कोरोना झाला असून तो ही डोंबिवली पश्चिमेत वास्तव्याला आहे. या दोन्ही रुग्णांचे वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजच्या घडीला 86 रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण