शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कल्याण डोंबिवलीत आढळले कोरोनाचे 12 नवे रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 97 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:04 IST

महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत कल्याण पेक्षा डोंबिवली आघाडीवर आहे.

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत  आज कोरोनाचे आणखीन 12 नवे रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 97 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांमध्ये पोलिस, परिचारिका व डायलेसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत कल्याण पेक्षा डोंबिवली आघाडीवर आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने डोंबिवली पूर्वेतील 51 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 27 वर्षाचा तरुण या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 59 व 51 वर्षीय दोन महिला व 71 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. हे तिघेही जण डायलेसिस उपचार घेणारे आहेत. सरकारच्या आरोग्य खात्याच्या नियमानुसार डायलेसिस रुग्णांनी कोरोनाची चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार या तिघांची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आला आहे. कल्याण पूर्वेतील 44 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. तो 15 एप्रिलपासून मुबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला उपचारांती 21 एप्रिल रोजी घरी पाठविण्यात आले आहे. 36 वर्षीय पोलिसाची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली. तो कल्याण पूर्वेत राहणारा आहे. 57 वर्षीय परिचारिका शासकीय रुग्णालयात काम करते. ती कल्याण पूर्वेत राहते. तिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेतील 37 वर्षे पुरुषाला व आंबिवलीतील 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. हे दोघेही ठाणे येथील काम करणा-या कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात आले होते. महापालिका हद्दीत आत्तार्पय त कोरोनाग्रस्त तीन रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. उपचारांती आत्तार्पयत 33 जणांना घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 61 आहे. त्यापैकी 29 रुग्ण हे कल्याण शीळ रोडलगत असलेल्या पडले गावातील नियॉन रुग्णालयात उपचार घेत आहेत. 11 रुग्णांवर डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. उर्वरीत 21 रुग्ण हे मुंबईतील विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली