शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कल्याण-डोंबिवलीत आढळले 11 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 17:13 IST

आज महापालिका हद्दीत नवे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 108 झाली आहे.

ठळक मुद्देकॅन्सर रुग्णासह सरकारी कर्मचा-यांच समावेशएकूण रुग्णांची संख्या झाली 108आज 11 नवे रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुले कल्याण डोंबिवलीची चिंता वाढत आहे

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. आज महापालिका हद्दीत नवे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 108 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कॅन्सर रुग्णासह धारावीतील शासकीय कर्मचारी व मुंबईतील रुग्णालयातील कर्मचा-याचा समावेश आहे.मधूमेह व रक्तदाबाचा आजार असलेल्यांना कोरोनाची लागण लवकर होते. तसेच कॅन्सर रुग्णामध्ये प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुले त्यांनाही कोरोनाची लागण लवकर होते. महापालिका हद्दीत कल्याण पूव्रेत राहणा-या 42 वर्षीय कॅन्सर रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. धारावी येथे काम करणारा 53 वर्षीय शासकीय कर्मचारी हा कल्याण पूव्रेत राहतो. त्याला कोरोना झाला आहे. त्याचबरोबर मुंबईतील सरकरी रुग्णालयात काम करणा-या 33 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर ठाणे येथे सरकारी कर्मचारी असलेल्या 43 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे.  हे दोघेही कल्याण पूर्वेत राहतात.डोंबिवली पश्चिमेतील 50 वर्षीय इसम आणि 22 व 23 वर्षीय तरुणासह कल्याण पश्चिमेतील 64 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला आणि 54 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आह. हे रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर मांडा टिटवाळा परिसरात 42  पुरुषाला कोरोना झाला आहे. या सगळ्य़ा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यत  33 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 72 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 12 नवे रुग्ण आढळून आले होते. आज 11 नवे रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुले कल्याण डोंबिवलीची चिंता वाढत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली