शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यास खासदार कपिल पाटील यांच्याकडून १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 13:07 IST

coronavirus : या निधीचा भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी वापर केला जाणार आहे.

डोंबिवली : जिल्ह्यातील काही शहर वगळता अन्यत्र अद्याप 'कोरोना'चा संसर्ग झाला नसला, तरी भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सहायता निधीकडे प्रदान केला आहे. त्यातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात  'कोरोना'विरोधात विजय मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

कोरोनाने जग हादरले आहे. भारतालाही मोठा तडाखा बसण्याची भीती आहे.  त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांत खारीचा वाटा म्हणून खासदार कपिल पाटील यांनी खासदार निधीतून १ कोटी रुपये व आपला एक महिन्याचा पगार दिला. या निधीचा भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी वापर केला जाणार आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकसंख्या मोठी आहे. भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायात हजारो कामगार आहेत. या कामगारांमध्ये संसर्ग होण्याची भीती आहे. सुदैवाने अद्याप भिवंडीत एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खासदार कपिल पाटील यांच्याबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत केली जात आहे.

अडचणीतील कामगारांना मदतभिवंडीत मजुरीसाठी आलेले कामगार अडकले असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंग पटेल, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रदीपकुमार सिंग, राजेंद्र कुशवाह यांनी खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार पाटील यांच्या सुचनेनंतर भाजपाचे कार्यकर्ते व कपिल पाटील फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडचणीत कुटुंबांना मदत केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस