शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavaccine: लसीकरण लांबल्यामुळे लाखो तरुणांची निराशा; लसींचा तुटवडा, १ मेचा मुहूर्त हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:34 IST

लसींचा तुटवडा : १ मेचा मुहूर्त हुकणार

सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून त्यावर मात करण्यासाठी १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार होती. पण, लस तुटवड्याअभावी काही दिवसांसाठी हा मुहूर्त टाळण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील १८ ते ४४ या वयोगटातील तब्बल ४३ लाख ६३ हजार ९८ तरुणांची निराशा झाली आहे.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढायला लागली. त्यापासून बचाव करण्यासह कोरोनामुक्त राहण्यासाठी सध्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून राज्य शासनाने १ मे या ‘महाराष्ट्र दिनी’ १८ वर्षांवरील युवा, युवतींचे लसीकरण करण्याचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र, ही प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात सध्या उपलब्ध नसल्याने हा लसीकरणाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील नवतरुण, तरुणींच्या लसीकरणाचे वेळापत्रक आता काही दिवसांसाठी तरी कोलमडले आहे.

या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी वापरण्यात येत आहेत. या लसींपैकी जिल्ह्यात प्रारंभापासून आतापर्यंत कोविशिल्डला सर्वाधिक १० लाख ५२ हजार ७१८ जणांनी पसंती दिली आहे.  याखालोखाल कोव्हॅक्सिनचे अवघ्या १ लाख २ हजार ६८४ जणांना डोस देण्यात आले आहेत. आजपर्यंत झालेल्या ११ लाख ५५ हजार ४०२ लोकांच्या लसीकरणापाठोपाठ जिल्ह्यातील ४३ लाख ६३ लाख ९८ जणांच्या लसीकरणास शनिवारपासून प्रारंभ होणार होता. तो आता काही दिवस लांबला आहे. 

या १० लाख ८६ हजार तरुणांसह ३९ वर्षांच्या १५ लाख ९२ हजार ३६ तरुणांसह ४४ वर्षापर्यंतच्या १६ लाख ८५ हजार ३१ जणांचे लसीकरण आता लांबणीवर पडलेले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांना आता प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याशिवाय पर्याय नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे