कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी तब्बल ६५१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर २७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपाच्या हद्दीत एकूण ७० हजार ५७४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यातील ६४ हजार ४५४ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर १,२२६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ४,८९४ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी कल्याण पश्चिमेत तब्बल २२४ तर डोंबिवली पूर्वेत १९३ रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतही आता रुग्ण वाढू लागले आहेत. रविवारी अनुक्रमे १०७ तर ९२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोनाचा कहर पाहता २१ दिवसांत तब्बल पाच हजार ९९० रुग्ण मनपाच्या हद्दीत आढळले आहेत तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
------------------------------------------------------