शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोनाच्या भीतीने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली; ब्रेथ अ‍ॅनालायझर टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:33 IST

कोरोना या जीवघेण्या आजाराचे रुग्ण आढळल्याने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने हायअलर्ट जारी केला असून, सर्वत्र काळजी घेतली जात आहे.

ठाणे : कोराना हा संर्सगजन्य आजार असल्याने सर्वांनाच दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण करोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी ठाण्याच्या वाहतूक विभागाने खबरदारी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या ५४ मद्यतपासणी (ब्रेथ अ‍ॅनालायझर) यंत्रांचा वापर करण्यास कर्मचारी/अधिकाऱ्यांना मनाई केली आहे. या संदर्भात आदेशच काढला असून तो संपूर्ण पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रात लागू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना या जीवघेण्या आजाराचे रुग्ण आढळल्याने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने हायअलर्ट जारी केला असून, सर्वत्र काळजी घेतली जात आहे. धुळवडीच्या सणावरही त्याचा परिणाम दिसून आला आहे. शासनाने याआधीच नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हस्तांदोलन अथवा अलिंगण टाळावे, मास्क वापरावेत, असे आवाहन करून योग्य खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आता ठाणे पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मद्यप्राशन करून गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण तपासण्यासाठी मद्यतपासणी यंत्राचा वापर केला जातो. ते घेऊन वाहतूक पोलीस नाक्यांवर उभे असतात. संशयित व्यक्तीच्या तोंडात यंत्राचा पाइप टाकून त्याला फुंकण्यास सांगितले जाते. त्यानंतर ती व्यक्ती मद्य प्यायली आहे का? त्याचे प्रमाण किती? हे पाहिले जाते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, आता कोरोना व्हायरसची भीती पसरल्याने मद्यतपासण्याची ही पद्धत सध्या बंद करून त्याऐवजी नाकाबंदीत असा मद्य पिणारा कोणी संशयित आढळला तर त्याला थेट डॉक्टरांकडे नेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. ठाणे वाहतूक विभागाने हा आदेश काढला आहे. तो संपूर्ण पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रात लागू असून, वाहतूक पोलिसांकडे देण्यात आलेली ५४ यंत्र जमा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा व्हायरस संसर्गजन्य आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडे असलेल्या ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राचा वापर सध्या थांबविला आहे. त्याऐवजी आता मद्य पिऊन गाडी चालवित असताना कोणी संशयित आढळला, तर त्याला नजीकच्या रु ग्णालयात नेऊन डॉक्टरांकडून त्याची तपासणी केली जाते. मद्याचे सेवन केल्याचे तपासणीत आढळून आले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात पाठविले जाते. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग ठाणे

टॅग्स :corona virusकोरोनाPoliceपोलिस