शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोनामुळे दिवाळे निघाले, आम्हाला हवी नुकसानभरपाई", जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:21 IST

एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे. 

- अजित मांडकेठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बुडाले. कित्येकांना नुकसान सहन करावे लागले. आता कोरोना असला तरी सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे आम्हाला मागील दोन वर्षात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी ठाणे  जिल्ह्यातील अनेक दुकानदार, व्यापारी व संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे. शिवाय, या पत्र घोळातून मार्ग कसा काढायचा, या पेचात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सापडले आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आली. यावेळी कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जवळजवळ सहा महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. त्याचा फटका अनेकांना बसला. नोकऱ्या गेल्या, संसार उद्ध्वस्त झाले. काहींचे नव्याने सुरू केलेले उद्योगही कोलमडले.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत कोरोनाची दाहकता कमी झाल्याचे लक्षात आल्याने सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत. दरम्यान, सरकारने कोरोनामुळे जीव गमावलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. विधवा, लहान मुले असलेल्यांच्या परिवारांसाठीही मदत देऊ केली. असाच मदतीचा सरकारकडून मिळावा, या हेतूने गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रे येऊ लागली आहेत. कोरोनाच्या काळात तुम्ही केलेल्या लॉकडाऊनमुळे माझ्या व्यवसायाला फटका बसला. दोन वर्षात माझे नऊ लाखांचे  नुकसान झाले आहे. ते भरून निघावे आणि त्यावर १८ टक्के व्याज मिळावे, अशा आशयाची पत्रे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय ठरली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही पत्रे स्वीकारली आणि ती पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवू. त्यांच्याकडून उत्तर आल्यावर तुम्हाला कळवू, अशा उत्तरांनी तुर्तास  तक्रारदार पत्रकर्त्यांची समजूत काढली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे