शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: ‘गडकरी’ला कोरोनाचे कुलूप; गर्दी टाळण्यासाठी केल्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 00:30 IST

कोरोनाची धास्ती : घाणेकर, गडकरीतील कार्यक्रम रद्द

ठाणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, मोठे कार्यक्रम घेऊ नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याचा परिणाम ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कार्यक्रमांवर झाल्याचे दिसून आले आहे.घाणेकर नाट्यगृहात विविध संस्थांचे मार्च आणि एप्रिल महिन्यातील दहा कार्यक्रम आयोजकांनी स्वत:हून पुढे ढकलले आहेत. याशिवाय गडकरी रंगायतनमधील दोन कार्यक्रम रद्द झाले आहेत.

कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतला आहे. राज्यात कोरोनाचे १५ रुग्ण झाले असून, ठाण्यातही एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्तकतेच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचेही आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेले मार्च आणि एप्रिल महिन्यांतील विविध संस्थांचे दहा कार्यक्रम आयोजकांनी स्वत: रद्द केले आहेत. यात काही सांस्कृतिक, तर काही शाळांचे कार्यक्रम, तसेच संगीत कार्यक्रमांसह खासगी कार्यक्रमांचाही समावेश होता.महिलांचा सत्कार रद्दगडकरी रंगायतनमध्ये महिलादिनाचे औचित्य साधून ११ महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो रद्द करुन शुक्रवारी पालिकेतील महापौर दालनात घेण्यात आला. आणखी एक कार्यक्रम आयोजकांनीच रद्द केला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना