शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus: उल्हासनगरात आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 17:20 IST

उल्हासनगर उद्योगिक शहर असल्याने व्यवसायाच्या निमित्त अनेक जण परदेशीवाऱ्या करीत आहेत.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : दुबई वरून आलेल्या एका रुग्णाला कोरोनाचे लक्षणे आढळले आहे. त्याच्यावर शुक्रवारी रात्री प्राथमिक उपचार करून मुंबई येथील कस्तुरबा रूग्णालयात उपचारासाठी पाठविल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. याप्रकाराने शहरात खळबळ उडाली असून त्याच्या संपर्कात आलेल्यांची व कुटुंबाची तपासणी व उपचार महापालिकेचे पथक करीत आहे. 

उल्हासनगर उद्योगिक शहर असल्याने व्यवसायाच्या निमित्त अनेक जण परदेशीवाऱ्या करीत आहेत. व्यवसाया निमित्त गेलेल्या एका सिंधी नागरीक 9 मार्चला उल्हासनगरात परतला. त्याला 12 मार्चला ताप आल्याने त्याने खाजगी रुग्णालय गाठले. मात्र तेथील डॉक्टरांनी शासकीय जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान सदर रुग्ण  उपचारासाठी आला.

मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांना कोरोना व्हायरसचे लक्षणे त्याच्यात आढळल्याने, त्यांनी प्राथमिक उपचार करून मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्वरित पाठविले. अशी माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. तसेच याबाबत महापालिकेला माहिती दिली असून त्याच्या संपर्कातील व कुटुंबाची तपासणी करण्याचे सुचविल्याचे डॉ शिंदे म्हणाले.

शहरात संशयित कोरोनाचा रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली असून महापालिका आयुक्तांनी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले. तसेच 45 जिम, 6 चित्रपटगृह व तरण तलाव बंद करण्यात आले आहे. संशयित कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व कुटुंबाची पालिका वैद्यकीय पथक तपासणी करून उपचार देत आहेत. कस्तुरबा रुग्णालयातून तपासणी झाल्यानंतरच खरा प्रकार उघड होणार असल्याचे मत डॉ शिंदे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाulhasnagarउल्हासनगर