शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

Corona Vaccination: ठाणे, पालघरमध्ये लसींचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 00:54 IST

ठाणे शहरात दोन दिवस लसीकरण बंद : तिन्ही जिल्ह्यांत ४१,२०० लसींचाच साठा

ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणची केंद्रे बंद करून काही ठिकाणी त्यांची संख्या कमी केली आहे. ठाण्यात तर वीकेण्ड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वास्तविक, ठाणे महापालिकेकडेदेखील अगदी तुरळक लसींचा साठा आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघरसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा अवघा ४१ हजार २०० लसींचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. असे असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागासह काही महापालिकांच्या ठिकाणी लसींचा साठा जवळजवळ संपला आहे.ठाण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यांत सध्या लसींचा अपुरा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यासह या जिल्ह्यांनीदेखील लसींचा साठा मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे; परंतु अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यांतही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघा एक हजार ८४० डोस शिल्लक आहेत. येथे कोविशिल्डचा साठा शिल्लक नाही, तर रायगड जिल्ह्यातही कोव्हॅक्सिनचे तीन हजार ६८० आणि कोविशिल्डन्या १०० लसींचा साठा उपलब्ध आहे. भिवंडीत कोविशिल्डचे ८०० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे दोन हजार ६५० आणि कोविशिल्डचे ३० डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे सहा हजार ७२० डोस असून, कोविशिल्डचा साठा संपुष्टात आला आहे, तर मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे पाच हजार ५८० डोस शिल्लक आहेत, नवी मुंबईतही कोव्हॅक्सिनचे पंधरा हजार डोस शिल्लक आहेत, तर उल्हासनगरमध्ये कोविशिल्डचे एक हजार १२० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे येथील अनेक केंद्रे बंद केली आहेत, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसींचा साठा संपल्याने  लसीकरणाला ब्रेक लागला आहे.ठाण्यात नागरिकांनी धरली घराची वाटठाणे महापालिकेने वीकेण्ड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही रुग्णालयांनी शुक्रवारी ५० जणांचेच लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट करून तसे फलक लावले होते, तर पालिकेद्वारे सुरू असलेल्या केंद्रावर लसीकरण कमी प्रमाणात झाल्याचे दिसत होते, तर काही केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाली हाेती. अनेक नागरिकांना तर घराची वाट धरावी लागली.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस