शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

corona vaccination : कोव्हिशिल्डचा पुरवठा थांबला, ठाण्यात कोविड लसीकरणाला ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:09 IST

corona vaccination in Thane : कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठाणे  - देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.तेव्हा,कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. (corona vaccination in Thane) कारण,सिरम इन्स्टीट्युटच्या कोव्हीशिल्ड लसीचा पुरवठा बंद झाल्याने ही आफत ओढवल्याचे समजते.कोव्हीशिल्डऐवजी कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा होणार असला तरी, यापूर्वी कोव्हीशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांची गैरसोय होण्याची भिती ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली असुन यासंदर्भात,ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याचप्रमाणे,शासनाकडेही याबाबत मागणी केली असुन ठाण्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करावा.अशी माहिती आ.केळकर यांनी दिली. (Covishield supply stopped, covid vaccination break in Thane?)केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक,फ्रंटलाईन वर्कर्स,४५ वर्षावरील विविध व्याधीग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.यासाठी शहरात खाजगी ११ व ४२ शासकिय अशा ५३ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.त्यानुसार, लसीकरण सुरु असुन सिरमच्या कोव्हीशिल्ड लसीदवारे दररोज सुमारे ७ हजार ५०० नागरीकांचे लसीकरण होते.आजपावेतो ८२ हजार नागरिकांचे पहिल्या टप्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र,सद्यस्थितीत कोव्हीशिल्ड लसीचा साठा संप त आला असुन जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच कोव्हीशिल्डचा साठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान,गेले काही दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन ठाणे शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी सोमवारी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन लसीकरणाबाबत चर्चा केली.तसेच,लस पुरवठ्याबाबत आढावा घेत शासन दरबारीही पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली.तर,यावेळी आयुक्तांनी १० हजार कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा होणार असल्याचे स्पष्ट करीत त्याबाबतच्या प्रशिक्षणाला दुजोरा दिला.तरीही,यापुर्वी तब्बल ८२ हजाराहुन अधिक नागरिकांना पहिला डोस कोव्हीशिल्ड लसीचा देण्यात आला असताना त्यांना दुसरा डोस अन्य लशीचा चालणार नाही.तेव्हा, कोव्हीशिल्ड लस घेतलेले नागरिक मात्र धास्तावले आहेत.

ठाण्यात लसीकरण केंद्र वाढवा - केळकर ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे.अशा सुचना केळकर यांनी ठामपा प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.त्याचबरोबर सध्या असलेल्या ११ खाजगी व ४२ शासकिय अशा एकुण ५३ केंद्रातुन लसीकरण सुरु आहे.तरीही, ठाण्यात आणखी केंद्र वाढवण्याची आवश्यक्ता असुन तीन पेट्रोलपंप जवळील रेडक्रॉस भवन येथेही लसीकरण केंद्र सुरु केल्यास नागरिकांची फरफट थांबवता येईल. अशी मागणी आ. संजय केळकर यांनी आयुक्तांकडे केली असुन शासनानेही या मागणीला त्वरीत मंजुरी द्यावी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे