शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Corona Vaccination: ६२ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:32 IST

कोरोना प्रतिबंधक लस; जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी दुसरा डोस घेऊन लसीकरणाचे दोन्ही डोस यशस्वीरीत्या पूर्ण केले. याप्रमाणे जिल्ह्यातील अन्यही ६१ हजार ९९६ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि अन्य नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दुसरा डोस घेऊन कोरोनाच्या संकटावरील मळभ हलके केले.सिव्हिल रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी या लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित केल्याचे ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील ३,४४२ लसीकरण केंद्रांवर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पहिल्या फळीतील २,६९,६१३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. ६१,९९६ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कोरोना प्रतिबंधात्मकचा दुसरा डोस यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील ७०,५९५ डॉक्टर, परिचारिका आदींनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी ३६ हजार ८९३ जणांनी त्यांचा दुसरा डोसही लसीकरण केंद्रांवर जाऊन आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. याप्रमाणेच पहिल्या फळीतील पोलीस यंत्रणेतील ५२,४६२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून, २४,०३० जणांनी या लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.याप्रमाणेच ४५ ते ६० वर्षे वयोगटातील २५,१६० नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस जिल्हाभरातून घेतला आहे. तर, यापैकी १९१ जणांनी त्यांचा दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील १,२१,३९६ ज्येष्ठांनी त्यांचा पहिला डोस घेतला आहे. यापैकी ८८२ ज्येष्ठांनी आतापर्यंत दुसरा डोस घेऊन कोरोनाला पळवून लावण्यास सज्जता दाखवली आहे.ठाण्यातील दीड लाख नागरिकांनी शनिवारअखेर घेतली लस ठाणे : शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू असून शनिवारअखेर एक लाख ५० हजार ४१३ लाभार्थ्यांचे ठाणे मनपाच्या आरोग्यकेंद्रात, खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण झाले आहे. आतापर्यंत ठामपाच्या लसीकरण केंद्रांवर २० हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ११ हजार १७७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये ९९ जणांना पहिला, तर एक हजार ६४० जणांना दुसरा डोस दिला आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी ठामपाच्या केंद्रात १७ हजार ३९५ लाभार्थ्यांना पहिला व आठ हजार २६५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून खाजगी रुग्णालयात ६४४ लाभार्थ्यांना पहिला व १८ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे.४५ ते ६० वयोगटांतर्गत ठामपा केंद्रात ९,७८३ जणांना पहिला, तर ८६ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला गेला आहे. याच वयोगटांतर्गत खाजगी रुग्णालयांतील केंद्रामध्ये ५,६०४ जणांना पहिला व दोन लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला गेला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये ठामपा केंद्रात ५३,१८१ जणांना पहिला तर, ४४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस