शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: मुंब्य्रात लसीकरणाला ५० % प्रतिसाद, डॉक्टरांना विनंती करूनही देतात नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:10 IST

Corona vaccination: ठाणे शहरात डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण शंभर टक्के झाले असताना मुंब्रा येथे लसीकरण मोहिमेतही ५० टक्के लक्ष्य साध्य झाले आहे.

ठाणे : शहरात डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण शंभर टक्के झाले असताना मुंब्रा येथे लसीकरण मोहिमेतही ५० टक्के लक्ष्य साध्य झाले आहे. ठाण्यात कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असतांना मुंब्य्रात डॉक्टर आणि फ्रन्टलाईन वर्कर्सनी लसीकरणाकडे पाठ फिरविली असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील लसीकरण वाढत नसल्याने वाढीव केंद्रही सुरू करण्यासाठी महापालिका पुढाकार घेत नसल्याचे दिसून आले आहे.मागील महिन्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पहिल्या आठवड्यात ठाण्यात केवळ चार सेंटर सुरू करण्यात आली होती. परंतु आता सेंटरची संख्या १५ झाली असून, प्रत्येक सेंटरवर १०० जणांना ही लस दिली जात आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला २२ हजार ६९२ डॉक्टर आणि १२ हजार ७८० फ्रन्टलाईन वर्कर असे मिळून ३५ हजार ४७२ जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. आतापर्यंत ९,२८४ डॉक्टर आणि फ्रन्टलाईन हेल्थ वर्करचे लसीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण ठाणे शहरात सोमवारी १४५ टक्के लसीकरण झाले आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करायची तयारी पालिकेने केली आहे.मुंब्य्रात मात्र कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचण येत आहे. लस नको म्हणून मुंब्य्रात डॉक्टरच नाकं मुरडत आहेत. त्यांना लस घेण्यासाठी वारंवार कॉल केले जात आहेत. त्यांना सेंटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांच्याकडून नकार दिला जात असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. १० टक्के डोस  रोज जातात वायाठाणे महापालिकेच्या माध्यमातून १५ सेंटरवर रोज लसीकरण सुरू आहे. रोजच्या रोज लसीचे १० टक्के डोस वाया जात आहेत. ते प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसmumbraमुंब्राdocterडॉक्टर