शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

ठाणे, भिवंडी, उल्हासनगरमध्ये कोरोना नियंत्रणात; नवी मुंबई, केडीएमसीत मात्र रुग्णसंख्या वाढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:29 IST

महापालिका प्रशासनांपुढे आव्हान कायम

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ठाणे शहरापाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील पंधरवड्यापासून घट झाली आहे. तसेच या शहरांमध्ये कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. परंतु, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या दोन्ही शहरांत संसर्ग रोखण्याचे आव्हान कायम आहे.

ठाणे जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते होते. मात्र, त्यानंतर बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस कमी-जास्त असा चढउतार दिसून येत आहे. मागील पंधरवड्यापासून मात्र ठाणे शहरासह भिवंडी आणि उल्हासनगर या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तर कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वाधिक असून ते राज्यात प्रथम तर देशात दुसºया क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भिवंडी आणि उल्हासनगर शहरांमध्येदेखील कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ होत असून बाधितांची संख्या घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत एकूण १७ हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भिवंडी शहरातील केवळ २९७ आणि उल्हासनगरातील ४२६ रुग्णांचा समावेश आहे. तर जून आणि जुलै महिन्यामध्ये ठाणे शहरात जिथे दररोज ३०० ते ३५० हून अधिक रुग्ण आढळून येत होते तिथे सध्या १००-१५० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरांत दोन हजार ५८० रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही शहरांमध्ये योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.नवी मुंबई, केडीएमसीत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण तीन हजारांवरसध्या भिवंडीत केवळ १८३, उल्हासनगरमध्ये ३२७ आणि ठाणे शहरात एक हजार ७८८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर मीरा-भार्इंदरमध्ये दोन हजार ८८, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार २८३, बदलापूरमध्ये ७६९ आणि अंबरनाथमध्ये ४६५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या मीरा-भार्इंदरमध्ये एक हजार ४५१, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार ३६०, बदलापूरमध्ये २७८ आणि अंबरनाथमध्ये ३०२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. याउलट नवी मुंबईत ३,४१६ आणि केडीएमसीत ३,१५७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या