शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम; ठाणे जिल्ह्याने ओलांडला १ कोटी डोसेसचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 11:11 IST

Corona Vaccine : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण डोसेसची संख्या १ कोटी ३६ हजार ६४९ एवढी झाली आहे.

ठाणे - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने १ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार ४४ हजार  नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण डोसेसची संख्या १ कोटी ३६ हजार ६४९ एवढी झाली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करीत लसीकरणाला अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ६१ हजार ६४८ नागरिकांना तर ३९ लाख ७५ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात आघाडी घेतली दिवसाला सरासरी ५० हजारापर्यंत लसीकरण केले जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात दर दिवशी ४५० ते ५०० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात येत आहेत. मात्र अजुनही लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला सांगितले. 

सध्या पहिला डोस न घेतलेल्या लाभार्थींची संख्या ठाणे जिल्ह्यात जास्त आहे मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही राज्याच्या सरासरीपेक्षा ही अधिक आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची राज्य सरासरी ४७.८४ टक्के असून ठाणे जिल्ह्याची ही सरासरी ५२.१५ टक्के एवढी असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेग अजून वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे