‘वेळेत ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:49 AM2020-06-04T00:49:15+5:302020-06-04T00:49:24+5:30

सोमय्या यांनी बुधवारी आयजीएम रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

'Corona positive woman dies due to untimely oxygen supply' | ‘वेळेत ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू’

‘वेळेत ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू’

Next

भिवंडी : शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड रु ग्णालयात आॅक्सिजनचा वेळेत पुरवठा न झाल्याने एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.तिच्या मृत्यूस राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.


सोमय्या यांनी बुधवारी आयजीएम रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, शाम अग्रवाल, प्रा. डॉ सुवर्ण रावळ, विनोद भानुशाली आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल महिलेचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात आॅक्सिजनचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप होता. गोपाळनगरमध्ये राहणाऱ्या या ५५ वर्षीय महिलेस पतीसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


३१ मे रोजी तिचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी रुग्णालय व महापालिका मुख्यालयास भेट देऊ न वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात आणि आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान रु ग्णालयात २० व्हेंटिलेटरची गरज असून चार उपलब्ध असल्याचे थोरात यांनी सांगितले. शासन बीकेसी येथे अद्यावत रु ग्णालय उभारते आणि ते बंदही करते. पण भिवंडीतील रु ग्णालयाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. 

 

Web Title: 'Corona positive woman dies due to untimely oxygen supply'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.