शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Corona in Thane ठाणे जिल्ह्याचा आकडा दोन हजारी; आणखी तिघे दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:27 IST

शनिवारी सापडले 184 नवे कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात शनिवारी नवे 184 रुग्णांची नोंद झाली आहेत. या नव्या रुग्णांनी जिल्ह्यातील रुग्णांची 2006 झाली आहे.तसेच तिघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ही 49 वर पोहोचली आहे. 24 तासात नवीमुंबईत सर्वाधिक 65 नवे रुग्ण मिळून आले असून भिवंडीत एक ही नवा रुग्ण नोंदवला गेला नाही. दुसरीकडे कल्याण- डोंबिवली महापालिकेने तिनशेचा आकडा पार केल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

  शनिवारी नवीमुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक 65 रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या ही 592 वर पोहोचली आहे. तसेच आजही नवीमुंबईत दोघांचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या 12 झाली आहे. तर ठाणे महापालिकेत नव्या 60 रुग्णांमुळे तेथील एकूण रुग्ण संख्या 671 इतकी झाली आहे. ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीत नवे 14 रुग्ण, वागळे इस्टेट 12 आणि लोकमान्यनगर-सावरकरनगर या समितीअंतर्गत 11 रुग्ण सापडले आहेत. त्या नव्या रुग्णांमध्ये 38 पुरुष रुग्ण आणि 22 महिला रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण- डोंबिवलीतही 25 नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्ण संख्येने तिनशेचा आकडा पार केला असून एकूण रुग्ण 305 झाले आहेत.यामध्ये 14 रुग्ण डोंबिवली आणि 10 रुग्ण कल्याण येथील आहेत.त्यातच एकाचा मृत्यू झाला असून तेथील मृत रुग्णांची संख्या चार वर गेली आहे. मिराभाईंदर येथे नवे 7 रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या 242 वर गेली आहे. उल्हासनगर येथे नवे 16 रुग्ण आढळून आल्याने रुग्ण 34 झाली आहे.

ठाणे ग्रामीण आणि बदलापूर येथे प्रत्येकी 5 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्ण संख्या अनुक्रमे 77 आणि 51 इतकी झाली आहे. एक नवीन रुग्ण अंबरनाथ येथे नोंदवल्याने तेथील रुग्ण संख्या 13 झाली आहे. तर भिवंडीत एक ही नवीन रुग्ण न सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 21 वर स्थिर राहिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस