शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, निसर्ग चक्रीवादळाचे गणेशोत्सवात विघ्न, मूर्तिकार चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:56 IST

मूर्तिकार चिंतित : बुकिंगही १० ते १५ टक्क्यांवर

प्रज्ञा म्हात्रे 

ठाणे : गणेशोत्सवाबाबत सरकारने अद्याप कोणतेही धोरण जाहीर न केल्यामुळे मूर्तिकारांबरोबर गणेशभक्तही चिंतित आहेत. कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाचे विघ्न मूर्तिकारांवर आले आहे, त्यातच सरकार भूमिका स्पष्ट करीत नसल्याने मूर्तिकार, गणेश भक्त आणि मंडळेही द्विधा परिस्थितीत आहेत. त्यामुळे दरवर्षी या महिन्यात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त होणारी बुकिंग यंदा १0 ते १५ टक्क्यांवर आल्याचे ठाण्यातील मूर्तिकारांनी सांगितले.

गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि आता निसर्ग चक्रीवादळाचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. वाहतूक, कच्चा माल, कारागिरांची कमतरता, भक्तांच्या मनातील भीती यामुळे मूर्तिकार चिंतेने ग्रासले आहेत. ठाण्यात पेणहून कच्च्या गणेशमूर्ती बनवून येतात आणि येथील मूर्तिकार त्या मूर्तींचे रंगकाम करतात. जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतशी मूर्तिकारांच्या कामाची गती वाढत जाते. परंतु यंदा उत्सव साजरा करायचा की नाही, किंवा तो कशा पद्धतीने करायचा? याबाबत सरकारने काहीही जाहीर न केल्यामुळे मूर्ती बनविण्यापासूनच मोठी अडचण निर्माण झाली आहे.ज्या भागात मूर्ती बनविल्या जातात तिथे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे तेथील कामही थांबले आहे. दरवर्षीच्या ठरलेल्या भक्तांना बुकिंगसाठी मेसेज केले तर त्यांच्या मनातही उत्सव साजरा करण्याबाबत शंका आहे. त्यामुळे तेही थांबले आहेत.वाहतूक होत नसल्याने रंगकामाचे साहित्यही आणू शकत नाही, असे सचिन आणि राजेश गावकर या मूर्तिकारांनी सांगितले. वाहतुकीबाबत सरकार काही सांगत नाही. त्यामुळे सरकारने घरगुती गणेशोत्सवाबाबत तरी भूमिका जाहीर करावी, असे मूर्तिकार अरुण बोरिटकर म्हणाले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव