मुंब्रा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ जवळ असलेल्या एका बँकेच्या सुरक्षारक्षकास कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बुधवारी या बँकेचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बाधा झालेल्या रक्षकास दोन ते तीन दिवसांपासून ताप येत होता, तसेच खोकल्याचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीअंति ते कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. दरम्यान, सुशिक्षिततेची उपाययोजना म्हणून बँकेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, यासाठी समाजसेवक इरफान दळवी यांनी पुढाकार घेऊन निर्जंतुकीकरण विभागाशी संपर्क साधून, बँक निर्जंतूक करून घेतल्याची माहिती बँकेतील एका कर्मचाऱ्याने लोकमतला दिली.
बँकेच्या सुरक्षारक्षकास कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST