शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा कहर; एका दिवसात हजार रुग्ण : नागरिक बेजबाबदार, यंत्रणा तोकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

ठाणे : गेले काही दिवस अनेक निर्बंध लादूनही ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले ...

ठाणे : गेले काही दिवस अनेक निर्बंध लादूनही ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले नाही. उलट वाढता वाढता वाढे अशा पद्धतीने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. बुधवारी ठाण्यात कोरोनाचे ४९३ नवे रुग्ण आढळले, तर कल्याण-डोंबिवलीत ५९३ नवे रुग्ण आढळले. यामुळे केवळ या तीन शहरांमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.

कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक विनामास्क राजरोस फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाचे भय लोकांच्या मनात एक तर कमी झाले आहे किंवा बंधने पाळण्यास लोक विटले आहेत. या तिन्ही शहरांत प्रचंड गर्दी असून, एकाचवेळी हजारो लोक बंधने पायदळी तुडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करून नियम न पाळल्यास कारवाई अटळ आहे, असा संदेश ठळकपणे देण्यात संबंधित महापालिकांना यश आलेले नाही. दररोज काही शेकडा लोकांवर कारवाई होते. पण नियम तोडणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत ती संख्या नगण्य आहे.

सध्या विवाह सोहळ्यांना या शहरांत ऊत आला आहे. अनेक विवाह सोहळ्यांत निमंत्रितांचे बंधन पाळले जात नाही. गावात होणारी लग्ने, हळदीचे कार्यक्रम, डीजे लावून नाचगाणी याला एकाचवेळी शेकडो लोक हजर असतात. एवढ्या लोकांना रोखणे दोन-चार पोलिसांना अशक्य असते. त्यामुळे बऱ्याचदा मांडवली करून व पाहुणचार झोडून कारवाईला गेलेले पोलीस व महापालिका कर्मचारी परत येतात. एवढे सांगूनही लोक ऐकत नसतील, तर त्यांना त्यांच्या कर्माने कोरोना होऊ दे, अशी सरकारी यंत्रणेतील लोकांना शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या मंडळींचीही भावना झाली आहे.

..........

भाजप, मनसेचा असहकार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: मास्क घातल नाहीत. आता मनसेच्या नगरसेवकांनी, नेत्यांनीही मास्क घालणे बंद केले आहे. साहजिकच मनसैनिकांनाही मास्कचे वावडे निर्माण झाले आहे. भाजप हा राज्यातील विरोधी पक्ष असून, राज्य सरकार कोरोनाची हाताळणी करण्यात व लसीकरण करण्यात कसे अपयशी ठरले आहे, हे सिद्ध करण्याकरिता भाजपचे गल्लीपासून दिल्लीचे नेते झटत आहेत. त्यामुळे कोरोना नियम पाळणे व लसीकरण याला भाजपची मंडळी सक्रिय सहकार्य करीत नसल्याचे शिवसेनेचे व सरकारी कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आहे. या तिन्ही शहरात भाजप व मनसेचे प्राबल्य आहे.

........

वाचली