शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 16:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना या साथीच्या आजाराविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्र ...

ठळक मुद्दे ४० कलावंतांच्या चमूचा सहभाग सात तालुक्यातील १४० गावांमध्ये होणार प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना या साथीच्या आजाराविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. या कार्यक्र मांचे ठाणे जिल्ह्यातही आयोजन करण्यात आले आहे. लोककला आणि पथनाट्यांद्वारे शासनाने कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनप्रबोधन करण्यात येणार आहे.जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सात तालुक्यातील १४० गावांमध्ये या कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक नसलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ही जनजागृती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात चार संस्थांना शासनाने प्राधिकृत केले आहे . यासंस्थाच्या मार्फतीने ४० कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.कलापथकांच्या माध्यमातून कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी, पाळावयाचे नियम याबाबत गाणी, नाटक, भारु ड, पोवाडा, बतावणी आणि गवळण आदी माध्यमामातून जनजागृती केली जाणार आहे. हे कलापथक जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन प्रबोधन करणार असल्याचे कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस