शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 00:23 IST

कल्याण शहरातील घटना

कल्याण : पश्चिमेतील जोशीबागमधील एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गणेशोत्सवात हे कुटुंब एकत्र आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता केडीएमसीच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

जोशीबागेतील चार मजली इमारतीत एका व्यावसायिकाचे ४० जणांचे कुटुंब एकत्र राहते. या कुटुंबीयांनी दीड दिवसांचा गणपती बसविला होता. यावेळी उत्सवासाठी सगळे जमले होते. या कुटुंंबात सगळे जण एकत्र स्वयंपाक करतात. तसेच एकत्र जेवतात. गणेशोत्सवात कुटुंबातील एकाला कोरोनाची लक्षणे दिसली. त्याची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ३३ जणांची चाचणी केली असता ३० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी १३ जणांना मेट्रो तर, १७ जणांना ए अ‍ॅण्ड जी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४० वरपोहोचली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उपचाराअंती २६ हजार ११२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत ६६५ जणांचा मृत्यू आहे.

नियम धाब्यावर : अनलॉक-४ मध्ये जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. सरकारी व खाजगी कार्यालयेही अधिक मनुष्यबळाने सुरू झाली आहेत. त्यामुळे वाहने रस्त्यावर येऊ लागल्याने ठिकठिकाणी कोंडी होत आहे. मात्र, अनेक जण मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण