शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्याविरोधात केली विनयभंगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 00:26 IST

आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे.

- विशाल हळदे/ जितेंद्र कालेकरठाणे: आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने राजीव खन्ना या अभिनेत्याविरुद्ध दाखल केली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकल्यास आपण निर्वस्त्र होऊन भारतीय संघातील खेळाडूंना मैदानावरच मिठी मारु, त्यांचे चुंबन घेऊ, अशी घोषणा २०११ मध्ये करण्याचा स्टंट करणा-या पूनम पांडेने देशभरात एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. अर्थात, त्यावेळी तिने विवस्त्र होण्याऐवजी अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते प्रसिद्ध केले होते. त्यावर हे फोटो भारतीय क्रिकेट संघाला विश्वकप जिंकण्यास प्रेरीत करील, असे जाहीर केले होते. याच मॉडेलने आता राजीव खन्ना या अभिनेत्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीमध्ये तिने म्हटले आहे की, ते वारंवार अश्लील मेसेज पाठवितात. तसेच नेटच्या आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्यावर लक्ष ठेवतात.

लैंगिक अत्याचार करण्याची तसेच ठार करण्याची ते धमकी देतात. अनेकदा मोबाईलवरुनही त्यांनी अशा प्रकारे धमकी दिली आहे. यासंदर्भात, ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल झाली असून खन्ना यांना चौकशीसाठी बोलविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. तांबे यांनी सांगितले. विशेष म्हणजे नग्नतेमध्ये कोणतीही अश्लीलता नसून ते एक ग्लॅमर असल्याचाही दावा तिनेच एकेकाळी केला होता. तिच्या या तक्रारीचा अधिक तपशील मात्र मिळू शकला नाही.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणेPoonam Pandeyपूनम पांडे